शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नामांकन रद्द केलेल्या उमेदवारांना न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

येथील ग्राम पंचायत निवडणुकीत दोन उमेदवाराचे नामांकन छाननी दरम्यान निवडणूक अधिकारी यांनी रद्द केले.

घुग्घुस : येथील ग्राम पंचायत निवडणुकीत दोन उमेदवाराचे नामांकन छाननी दरम्यान निवडणूक अधिकारी यांनी रद्द केले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोन्ही उमेदवाराला निवडणूक लढविण्यास पात्र ठरविले असून त्यांना निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. घुग्घुस ग्राम पंचायतीसाठी नामांकन सादर करते वेळी वॉर्ड क्रमांक ५ मधून तिनदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या ममता खैरे यांनी अनु. जाती सर्व साधारण आणि सर्वसाधारण या दोन्ही जागेकरीता दोन अर्ज दाखल केले. अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडले. मात्र छाननी दरम्यान राखीव अनु. जाती सर्व साधारण जागेकरीता जातीचा दाखला जोडला नाही, या सबबखाली निवडणूक अधिकारी यांनी नामांकन रद्द केले. निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध ममता खैरे यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविण्यास पात्र ठरविले. तर वॉर्ड क्रमांक १ मधून अनु. जाती प्रवर्गातून गणेश शेंडे यांनी नामांकन आॅनलाऊन अर्ज भरून निवडणूक अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह सादर केला. मात्र छाननी दरम्यान कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांचेही नामांकन रद्द करण्यात आले. याविरूद्ध उच्च न्यायालयात अपील केली असता गणेश शेंडे हे निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचा निर्णय शुक्रवारी न्यायालयाने दिला. त्यांनाही चिन्ह देण्यात आला आहे. (वार्ताहर)