शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कापूस वेचण्याआधीच होतोयं काळा !

By admin | Updated: January 8, 2017 00:45 IST

कोरपना तालुक्याची औद्योगिक तालुका म्हणून सर्वत्र ओळख आहे. अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड, अंबुजा, मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपन्यामुळे या तालुक्यातील औद्योगिकरण वाढले.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान : उद्योग येतात; पण पर्यावरणाचे काय?रत्नाकर चटप नांदाफाटा कोरपना तालुक्याची औद्योगिक तालुका म्हणून सर्वत्र ओळख आहे. अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड, अंबुजा, मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपन्यामुळे या तालुक्यातील औद्योगिकरण वाढले. त्यानंतर गेल्या दोन वर्षापूर्वी विरुर- गाडेगाव गावात कोळसा खाण सुरु करण्यात आली. यात काहींना रोजगार मिळाला. झपाट्याने उत्पादनही सुरु आहे. मात्र क्षेत्रातील रस्त्यालगतच्या कापसाच्या पांढऱ्या शेत्या पुरत्या काळ्या झाल्या आहे.विशेष म्हणजे, कंपन्या झाल्या असल्या तरी गावातील अद्यापही १७ टक्के लोकांच्या रोजगाराचा प्रश्न कायम आहे. ज्यांच्या जमिनी उद्योगात गेल्या, त्यांना त्याचा मोबदला आणि नोकऱ्या मिळाल्या. ते कुटुंब सुखी झाले. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कोळसा खाणीत गेलेल्या नाहीत, त्यांच्यापुढे आता रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाडेगाव- भोयगाव व मुख्य मार्गाने दररोज २०० ते ३०० चारचाकी, सहाचाकी वाहनाची वर्दळ असते. कोळशाची वाहतूक करताना कोळशावर फाड्याही झाकल्या जात नाही. ऐवढेच नाही तर अनेक ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात येतात. यामुळे नगारिकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. कोळशाच्या धुळीमुळे शेतात असलेला पांढरा कापूस काळा पडला आहे. त्यामुळे वर्षभर कष्ट करुन राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. सदर कापसाची वेचणी करुन कापूस खरेदी केंद्रावर नेल्यानंतर कवडीमोल भावात कापसाची विक्री होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. यातच कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक गाडेगाव गावातून होते. यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. गावातील रस्त्यावर थातूरमातूर पाणी टाकून धुळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न व्यवस्थापनामार्फत होत असला तरी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी गावात व्यवस्थापणाने काही वाहतूक नियंत्रक नेमले खरे. परंतु रस्त्यावरची मोठी वर्दळ पाहता अपघाताची शक्यता दिवसेंदिवस निर्माण होत आहे. कोळशाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत असले तरी प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.रस्त्यावर मोठे खड्डेकोळशाच्या वाहतुकीमुळे गाडेगाव - भोयगाव रस्त्याची अवस्था गंभीर झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून प्रवाशांना नरकयातना सोसाव्या लागत आहे. याकडे कोळसा व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसते. वारंवार थातूरमातूर डागडूजी करुन गावकऱ्यांचे समाधान केले जात असले तरी रस्त्याची समस्या कायम आहे.