शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन व्यवस्थापनाचा खर्च पडतोयं भारी

By admin | Updated: December 7, 2014 22:46 IST

सावली तालुक्यातील चार हजार ५४२ हेक्टर शेतीला वरदान ठरणारी वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना २००६ मध्ये सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या व्यवस्थापनाचा खर्चच भागत नसल्याने विद्युत देयके,

वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना मंगेश भांडेकर - चंद्रपूरसावली तालुक्यातील चार हजार ५४२ हेक्टर शेतीला वरदान ठरणारी वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना २००६ मध्ये सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या व्यवस्थापनाचा खर्चच भागत नसल्याने विद्युत देयके, कालवा स्वच्छता आदी कामे करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. योजनेसाठी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव मंजूर न झाल्याने अडचणी येत आहेत.सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी गावाजवळ वैनगंगा नदीवर ही योजना कार्यान्वीत आहे. या योजनेचे काम २००६ मध्ये पुर्ण झाले असून शेतीसाठी पाणीही सोडले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सावली तालुक्यातील २० गावातील शेतीला सिंचनाचा लाभ नियोजीत आहे. आतापर्यंत ४५४२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर १९९३ ला शासनाने वाघोली बुट्टी उपसा योजनेला मान्यता देऊन ९५०.०० लक्ष रुपयाची पहिली सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान केली. त्यानंतर २४ फेब्रवारी २००० ला ४२३३.६०६ लक्ष रुपयांची दुसरी सुधारीत मान्यता दिली. यात योजनेचे काम पुर्ण करुन शेतकऱ्यांना पाणी सुरु करण्यात आले. मात्र, योजना व्यवस्थापनाचा खर्च भागत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. योजनेच्या मुख्य कालव्यासाठी लागणाऱ्या १.४६ हेक्टर जमीनीचा वनप्रस्ताव मुख्य वनसंरक्षक (केंद्र) प्रादेशिक कार्यालय, भोपाल यांनी २६ फेब्रुवारी १९९७ ला मंजूर केला. प्रकल्पासाठी ९१.५० हेक्टर खाजगी जमीनीची आवश्यकता होती यात बहुतांश जमीन संपादीत करण्यात आली.तर सामदा बुज, उपरी, जाम केरोडा, जाम बु. या गावातील भूसंपादनाचे ७ प्रस्ताव कार्यवाहीत आहेत. या प्रकरणा व्यतीरिक्त पेटगाव व निलसनी पेटगाव येथील दोन प्रकरणे महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे व्यापगत झाली आहेत. सदर प्रकरणे सर्व सोई सवलती पुरवूनही वारंवार व्यापगत का होत आहेत. ही प्रकरणे व्यापगत होण्यास पात्र असतील तर पुन्हा नव्याने कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरेल, अशा परिस्थीतीत सदर प्रकरणे कलम १७ ला लावून तातडीने निकाली काढण्याचे पत्र सिंचन विभागाने महसूल विभागाला दिले आहे. मात्र, अद्याप कोणताही अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे ही प्रकरणे व्यापगत झाली आहे.