शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन व्यवस्थापनाचा खर्च पडतोयं भारी

By admin | Updated: December 8, 2014 22:32 IST

सावली तालुक्यातील ४ हजार ५४२ हेक्टर शेतीला वरदान ठरणारी वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना २००६ मध्ये सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या व्यवस्थापनाचा खर्चच भागत नसल्याने विद्युत देयके,

वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनामंगेश भांडेकर - चंद्रपूरसावली तालुक्यातील ४ हजार ५४२ हेक्टर शेतीला वरदान ठरणारी वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना २००६ मध्ये सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या व्यवस्थापनाचा खर्चच भागत नसल्याने विद्युत देयके, कालवा स्वच्छता आदी कामे करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. योजनेसाठी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव मंजूर न झाल्याने अडचणी येत आहेत.सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी गावाजवळ वैनगंगा नदीवर ही योजना कार्यान्वीत आहे. या योजनेचे काम २००६ मध्ये पुर्ण झाले असून शेतीसाठी पाणीही सोडले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सावली तालुक्यातील २० गावातील शेतीला सिंचनाचा लाभ नियोजीत आहे. आतापर्यंत ४५४२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर १९९३ ला शासनाने वाघोली बुट्टी उपसा योजनेला मान्यता देऊन ९५०.०० लक्ष रुपयाची पहिली सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान केली. त्यानंतर २४ फेब्रवारी २००० ला ४२३३.६०६ लक्ष रुपयांची दुसरी सुधारीत मान्यता दिली. यात योजनेचे काम पुर्ण करुन शेतकऱ्यांना पाणी सुरु करण्यात आले. मात्र, योजना व्यवस्थापनाचा खर्च भागत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. योजनेच्या मुख्य कालव्यासाठी लागणाऱ्या १.४६ हेक्टर जमीनीचा वनप्रस्ताव मुख्य वनसंरक्षक (केंद्र) प्रादेशिक कार्यालय, भोपाल यांनी २६ फेब्रुवारी १९९७ ला मंजूर केला. प्रकल्पासाठी ९१.५० हेक्टर खाजगी जमीनीची आवश्यकता होती यात बहुतांश जमीन संपादीत करण्यात आली.तर सामदा बुज, उपरी, जाम केरोडा, जाम बु. या गावातील भूसंपादनाचे ७ प्रस्ताव कार्यवाहीत आहेत. या प्रकरणा व्यतीरिक्त पेटगाव व निलसनी पेटगाव येथील दोन प्रकरणे महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे व्यापगत झाली आहेत. सदर प्रकरणे सर्व सोई सवलती पुरवूनही वारंवार व्यापगत का होत आहेत. ही प्रकरणे व्यापगत होण्यास पात्र असतील तर पुन्हा नव्याने कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरेल, अशा परिस्थीतीत सदर प्रकरणे कलम १७ ला लावून तातडीने निकाली काढण्याचे पत्र सिंचन विभागाने महसूल विभागाला दिले आहे. मात्र, अद्याप कोणताही अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे ही प्रकरणे व्यापगत झाली आहे.