शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीतील विकास कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: September 8, 2014 01:10 IST

नगरपालिकेतर्फे शहराच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत असून या प्रकरणाची चौकशी करावी, ..

भद्रावती : नगरपालिकेतर्फे शहराच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक नंदू पढाल आणि इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरपालिका क्षेत्रात विविध योजनांद्वारे अनेक विकासात्मक कामे सुरू आहे. विकासाच्या माध्यमातून शहराचा विकास करायचा आहे. मात्र नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार सुरु केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरात झालेले कामे निकृष्ठ दर्जाची असून नियमबाह्य होत आहे. ही कामे करताना इतर नगरसेवकांचे आक्षेप असतानासुद्धा नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले संगनमत करुन निकृष्ठ दर्जांच्या कामाचेही देयके प्रदान करुन घेतात. १६ आॅगस्टला पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत विषयांवर चर्चा न करता आणि नगरसेवकांनी केलेल्या प्रश्नाला उत्तरे न देता जबरदस्तीने कामे मंजूर करण्यात आली आहे. असे निवेदनात म्हटले आहे. निवीदा न मागवीता व सभागृहाची मंजूरी न घेता काही विकास कामे करण्यात आली आहे. स्थानिक पेट्रोल पंप चौकातील बाळासाहेब प्रवेशद्वार ते नागमंदिर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र सदर डांबरीकरण एक महिन्यात उखडल्यानंतरही त्याला नगर परिषदेची मंजुरी घेण्यात आली. या मंजुरीला नगर सेवकांनी विरोध दर्शविला असतानासुद्धा त्यावर चर्चा न करता स्वमर्जीने मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी ते काम मंजूर करवून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेवून दक्षता व गुणवत्ता नियंत्रक विभाग चंद्रपूर यांच्या मार्फत योग्य ती चौकशी करुन अहवाल सादर करण्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. दोषिंवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक नंदू पढाल, नगरसेवक कारेकर, नगरसेवक गौरकार, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश मालोदे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)