शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जीओवरून महापौरांना नगरसेवकांचे आव्हान

By admin | Updated: June 28, 2014 02:25 IST

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात में रिलायन्स जीओकडून उभारण्यात येणाऱ्या १०० टॉवरच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने ...

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात में रिलायन्स जीओकडून उभारण्यात येणाऱ्या १०० टॉवरच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने दिलेल्या मंजुरीवरून चंद्रपुरातील महानगर पालिकेतील राजकारण पेटणार अशी चिन्हे दिसत आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या आमसभेतील हा मंजुरीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या २९ नगरसेवकांच्या पत्राने शुक्रवारी या विषयावरून खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मागणी करणारे बहुतेक नगरसेवक काँग्रेसचे असल्याने महापौर संगिता अमृतकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष रामू तिवारी चांगलेच अडचणीत येणार, असे दिसत आहे.मनपातील २९ नगरसेवकांनी महापौरांच्या नावाने दिलेल्या या पत्रातून १०० टॉवरच्या उभारणीवर आक्षेप घेतला आहे. वैज्ञानिक कारणांचा हवाला देत, ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. फोर-जी यंत्रणा असलेल्या या टॉवरमधून पसरणाऱ्या लहरी भविष्यात चंद्रपूरकरांचे आरोग्य कोलमडून टाकतील. त्यामुळे २९ मेच्या आमसभेतील ठराव रद्द करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांचे शिष्ठमंडळ आज शुक्रवारी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांना भेटले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. महापौर संगीता अमृतकर यांना भेटण्यासाठीही हे शिष्ठमंडळ गेले होते, मात्र त्या कक्षात उपस्थित नव्हत्या. हा ठराव मागे न घेतल्याने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही या नगरसेवकांनी दिला आहे. महापौर संगिता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, गटनेता तसेच नगरसेवकांनी मोबाईल टॉवरमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नव्हती, असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. या प्रकाराचा विरोध करणाऱ्यांमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेनेसह अन्य नगरसेवकांचाही समावेश आहे. प्रवीण पडवेकर, अशोक नागापुरे, प्रशांत दानव, अनिता कथडे, शिल्पा आंबेकर, उषा धांडे, विणा खनके, गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर, समीना अंसारी, राजेश अडूर, रमावती यादव, राजेश रेवेल्लीवार, महेंद्र जायसवाल, देवीदास गेडाम, अनिल रामटेके, सुनीता अग्रवाल, एकता गुरले, मनोरंजन राय, लक्ष्मी पारनंदी, सुभेदिया कश्यप, राखी कंचर्लावार, लता साव, अजय खंडेलवाल, संगिता पेटकुले, योगिता मडावी, दुर्गेश कोडाम तथा आकाश साखरकर आदी नगरसेवकांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. (ंजिल्हा प्रतिनिधी)