शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कोरपना-जिवती प्रवास सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:27 IST

माणिकगड पहाडाच्या उंच डोंगरदऱ्यातून नागमोडी वाटेने जीवघेणा प्रवास करताना कोरपना येथून धनकदेवी मार्गाने जिवती गाठणे म्हणजे अग्निदिव्य होते.

ठळक मुद्देदिलासा : ४५ किलोमीटरचा प्रवास झाला अवघ्या १७ किमीचा झाला

आॅनलाईन लोकमतकन्हाळगाव : माणिकगड पहाडाच्या उंच डोंगरदऱ्यातून नागमोडी वाटेने जीवघेणा प्रवास करताना कोरपना येथून धनकदेवी मार्गाने जिवती गाठणे म्हणजे अग्निदिव्य होते. परंतु शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यान ४५ किमीचा हा रस्ता आता अवघ्या १७ किमीचा झाला आहे.तालुक्यातील रस्त्यांना गुळगुळीत रूप आल्याने प्रवाशांना हा मार्ग दिलासा देणारा ठरला आहे. कोरपना ते जीवती हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांचा आणि कमी अंतराचा झाला असून परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेली सात गावेही मुख्य प्रवाहात आली आहेत. कोरपना- जीवती तालुक्यातील धनकदेवी, पाकडीगुडा, पाटागुडा, जांभुळधरा (शेरकीगुडा) मरकागोंदी, कारगाव, धानोली, पिपर्डा आदी गावांमध्ये जाणे आता सहज शक्य झाले आहे. काही वर्षांपूर्वी कोरपना येथून जिवती जायचे झाल्यास गडचांदूर- नगराळा मार्गे ४५ किलोमीटरचा उलटफेरा घेत प्रवास करावा लागयचा आता. या रस्त्यांमुळे हेच अंतर आता १७ किलोमीटरवर आले आहे. यात २८ किलोमीटरच्या बचतीसोबतच कमी अंतर व जलद पोहचणारा मार्ग निर्माण झाला आहे. या रस्त्यांचे पक्क्या रस्त्यात रुपांतर होण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा मागणी रेटून धरली होती.स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी या रस्त्याचे भाग्य पालटले आहे. या मार्गामुळे पर्यटन व धार्मिक स्थळांपर्यंत ये-जा करण्यासाठी चांगली सोय निर्माण झाली आहे. यात पकडीगुड्डम धरण प्रकल्प, काराई -गोराई देवस्थान, धनकदेवी येथील धानाई मंदिर कुसळ येथील हजरत दुल्हेशाह बाबा दर्गा येथे जाण्यासाठी कायमची समस्या दूर झाली आहे. या मार्गाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कोरपनाअंतर्गत करण्यात आले आहे. नव्यान बांधण्यात आलेल्या मार्गामुळे कोरपना-कुसळ धानोली, धनकेदी- जीवती वनसडी- पिपर्डा, धनकदेवी- जीवती, जेवरा- चनई- येरगव्हाण- मरकागोंदी, धनकदेवी, जीवती, गडचांदूर, नगराळा, जीवती, टेकामांडवा आणि धनकदेवी ही गावे एकमेकांशी जोडल्याने अनेक समस्या दूर झाल्या आहेत. वाहतुकीसाठी या मार्गांचा आता वापर वाढल्याचे दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळाला ग्रामीण भागात बस सोडण्यासाठी नवे रस्ते उपयुक्त ठरले आहेत. बस प्रवासातील अडचणी दूर झाल्या आहेत.घाटावरील रस्ते दुर्लक्षितघाटावर जाणारे काही मार्ग उखडले आहेत. या रस्त्यांचे फेरडांबरीकरण करणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाने मजबूतीकरणाचे काम तातडीने सुरू केले पाहिजे.बससेवा सुरू करावीकोरपना- धनकदेवी -जिवती बससेवेची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सदर मार्ग कमी अंतराचा आहे. जिवती येथील नागरिकांना कोरपना, वणी, बेला, वरोरा, मुकुटबन, नागपूर तसेच यवतमाळ शहर गाठण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरला आहे.