जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४७ हजार ९८३ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३३ हजार ५२४ झाली आहे. सध्या १३ हजार ७६० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ७०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ९० हजार ४०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६९९ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ६४७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २२, यवतमाळ २१, भंडारा चार, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी व कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
चंद्रपूर शहरातील ४४ व ५६ वर्षीय पुरुष, तुकूम येथील ६५ वर्षीय पुरुष भिवापूर येथील ५० वर्षीय पुरुष, महाकाली कॉलनी परिसरातील ५८ वर्षीय महिला, अंचलेश्वर गेट परिसरातील ५५ वर्षीय महिला, विवेकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, नगीना बाग येथील ५५ वर्षीय पुरुष, गजानन महाराज चौक परिसरातील ५६ वर्षीय पुरुष, चिंचाळा येथील ७० वर्षीय महिला, घुग्घुस येथील ५५ वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष, बरडकिन्ही येथील ६५ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील ४० वर्षीय पुरुष, पिंपळगाव येथील ६८ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, वडाला पैकू येथील ७२ वर्षीय महिला, मूल तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील पंचशीलनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील मोकाशी लेआऊट येथील ६० वर्षे पुरुष, गडचांदूर येथील ५० वर्षीय पुरुष, राजुरा येथील ३५ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील ३६ व ५३ वर्षीय महिला, भंडारा येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र ५४९
चंद्रपूर तालुका ६४
बल्लारपूर ६९
भद्रावती १४९
ब्रह्मपुरी ११९
नागभीड २९
सिंदेवाही ३४
मूल ९०
सावली २३
पोंभुर्णा ०२
गोंडपिपरी १९
राजुरा ३८
चिमूर ६०
वरोरा १९०
कोरपना ७८
इतर २४