शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

कोरपना परिसराला औद्योगिक विकासाची आस

By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST

तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे.

कान्हळगाव (कोरपना) : तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे. हा तालुका आदिवासीबहुल अतिदुर्गम, नक्षलग्रस्त मागासलेला म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील गडचांदूर-नांदा परिसर व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मोठा उद्योग नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. बेरोजगारांचा भरणा वाढल्यामुळे हाती मिळेल ते काम नाईलाजास्तव त्यांना करावे लागत आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे तालुक्यातील अनेक गावांतील सुशिक्षित तरुण इतरत्र ठिकाणी काम शोधताना दिसत आहे. तालुक्यात असलेल्या उद्योगात स्थानिकांना ऐवजी परप्रांतीयांचाच जास्त भरणा केला जाते आहे. या कारणाने बेरोजगारीची समस्या अधिक जटील होत चालली आहे. कोरपना परिसर व तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास होण्यासाठी या भागात उद्योगांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. जेवरा-चोपन भागातील खनिज भागांना प्राधान्य देऊन तेथे उद्योगाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. औद्योगिक विकास केंद्राची (एमआयडीसी) या क्षेत्रात अद्यापही स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळेच या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास खुंटला आहे.सध्यस्थितीत तालुक्याचा अर्धा भाग औद्योगिक व उर्वरित शेतीप्रधान आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर अवलंबून राहावे लागते आहे. गडचांदूर, नांदा, नारंडा भागात उद्योग स्तिरावले असल्याने येथील विकास जलदगतीने घडून येते आहे. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना व परिसरातील कान्हळगाव, पारडी, जेवरा, परसोडा, कोठोडा, गोविंदपूर, कोडशी (बु.), दुर्गाडी, रुपापेठ, पांडुगुडा, मांगलहिरा, थिप्पा, उमलहिरा, चोपन चनई, मांडवा, सावलहिरा, खैरगाव, गांधीनगर, हातलोनी, कमलापूर, येरगव्हान, बोरगाव, धोपटाळा, हेटी, कातलाबोडी, तुळशी, पिपरी, माथा, कुसळ, पिपर्डा, वनसडी, महेंदी, आदी गावांकडे उद्योगच नसल्याने बेरोजगारीची समस्या आहे. यातील काही गावे, अतिदुर्गम व मागासलेली असल्याने या भागात विकासाचा सूर्य उगवला नाही. या भागातील औद्योगिकदृष्ट्या विकास घडून आल्यास, हा तालुका नक्कीच सुजलाम्, सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद येथील जनतेकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)