शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू

By admin | Updated: July 8, 2015 01:08 IST

मृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे.

पिके आॅक्सिजनवर : कृषी विभाग म्हणतो, ४८ तासांत पाऊस हवासंतोष कुंडकर चंद्रपूरमृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे. एकूणच कोरड्या दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले असून येत्या ४८ तासांमध्ये पाऊस न पडल्यास बिजांकुर मातीच्या गर्भातच करपण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी भीती कृषी विभागाने वर्तविली आहे. सध्या जिल्ह्यातील पिके आॅक्सीजनवर आहेत.मृग नक्षत्राच्या प्रारंभानंतर पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस कोसळला. त्यावरून यंदा पाऊस ‘जमके’ बरसेल, असा अंदाज लावण्यात येत होता. हवामान खातेही त्याला पुष्टी देत होते. मात्र गेल्या १५ दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. पावसाअभावी हजारो रुपये खर्च करून केलेली पेरणी मातीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, असे शेतकरी आपली पिके जगविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.पिकांच्या वाढीवर परिणामसध्या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र पाऊसच नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे उत्पादनातही घट होणार आहे. त्यामुळे बँका आणि सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. ७० टक्के पेरण्या आटोपल्याचंद्रपूर जिल्ह्यात धान हे मुख्य पीक असले तरी यंदा जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यातही मोठी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ हजार ७८४ हेक्टरवर धान, ३५ हजार हेक्टरवर सोयाबिन व एक लाख एक हजार हेक्टरवर कापसाची पेरणी आटोपली आहे. उर्वरित पेरण्या मात्र पावसाअभावी खोळंबल्या आहेत. पावसाने उघाड दिल्याने आंतरमशातीची कामेही अखेरच्या टप्प्यात आली आहेत. बळीराजा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत असला तरी पावसाची कोणतीच चिन्हे दिसत नाही. हवामान खात्याचा अंदाजही हवेतच विरलारविवारी हवामान खात्याने ४८ तासांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो अंदाजही हवेतच विरला आहे. ज्यांच्या शेताजवळून नाला वाहत आहे, ते शेतकरी मोटारपंपाद्वारे शेतात सिंचन करून पिकांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कोरडवाहू शेतकरी पावसाअभावी काकुळतीला आला आहे. सध्या पिकांची अवस्था लक्षात घेता पावसाची नितांत गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस येण्याची अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. -डॉ.ए.आर.हसनाबादेजिल्हा अधीक्षक,कृषी अधिकारी चंद्रपूरपाऊस न आल्याने धानाचे पऱ्हे कोमेजत असून सोयाबीनची रोपेही माना टाकत आहेत. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणाने कापसाची अवस्था सध्या तरी ठिक आहे. मात्र आता पावसाची नितांत गरज आहे. सुरूवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या, परंतु नंतर पावसाने चांगलीच दडी मारली. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.- मधुकर भलमे,शेतकरी, चारगाव (बु.)