शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयासमोरील नालीचे बांधकाम रेंगाळले

By admin | Updated: June 14, 2014 23:28 IST

स्थानिक अभ्यंकर प्रभागातील रेल्वे स्टेशन मार्गाच्या कडेला असलेल्या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सुरु केले. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या अर्धवट कामामुळे

वरोरा : स्थानिक अभ्यंकर प्रभागातील रेल्वे स्टेशन मार्गाच्या कडेला असलेल्या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सुरु केले. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या अर्धवट कामामुळे पावसाळ्यातील पाणी व नालीतील सांडपाणी नजिकच्या घरात शिरण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने या प्रभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रेल्वे स्टेशन मार्गालगतच्या बशिर आॅईल मिल ते स्टेट बँकपर्यंत वरोरा शहरातील सर्वात जुनी नाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. दरवर्षी पावसाळ्यात या नालीतील पाणी तुंबून राहते. परिणामी नालीतील घाण पाणी थोपून परिसरातील घरात दोन ते तीन फुटापर्यंत शिरत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या घरातील वस्तू मोठ्या प्रमाणात निकामी होतात. त्यामुळे या नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर नालीचे बांधकाम स्टेट बँकेपासून सुरू करण्यात आले. या नालीवर अतिक्रमण आहे. नालीचे बांधकाम पुढे जात असताना काहींनी अतिक्रमण काढण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे बांधकाम पुढे नेण्यास अडथळे निर्माण होवून काही दिवसांपासून बांधकाम बंद झाले आहे. सध्या कुठल्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यातच एखाद्यावेळी मुसळधार पाऊस आल्यास या नालीतील पाणी घरात जावून पुन्हा साहित्याची नासधूस होणार, या कल्पनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नालीतील घाण पाण्याचा सर्वाधिक धोका अंबादेवी वॉर्डात राहणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पालिका प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणून दिली. मात्र अद्यापही नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याच प्रभागाचे नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती छोटु शेख यांच्याशी संपर्क साधला असता, बांधकामामध्ये काही अडचणी आल्या होत्या, याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अडचणी दूर झाल्या. आता लवकरच उर्वरित नालीच्या बांधकामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती त्यांंनी दिली. (तालुका प्रतिनिधी)