शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

By admin | Updated: September 8, 2015 00:52 IST

येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी काँग्रेसच्या पुष्पा मेश्राम अविरोध तर उपसरपंचपदी संतोष नुने (काँग्रेस) विजयी झाले.

उपसरपंचपदासाठी निवडणूक : सरपंचपदी पुष्पा मेश्राम तर उपसरपंच संतोष नुनेघुग्घुस : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी काँग्रेसच्या पुष्पा मेश्राम अविरोध तर उपसरपंचपदी संतोष नुने (काँग्रेस) विजयी झाले.१७ सदस्य संख्या असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, रिपाइं, शिवसेना समर्थित १० तर भाजपचे सात सदस्य निवडून आले होते. सरपंचपद अनुसूचित जाती जमाती महिलेसाठी आरक्षित असून त्या प्रभागातून काँग्रेस पॅनलमधून पुष्पा मेश्राम निवडून आल्याने त्या या पदासाठी एकमात्र दावेदार होत्या. त्यामुळे पुष्पा मेश्राम यांची अविरोध निवड झाली. उपसरपंचपदाकरीता काँग्रेसकडून संतोष नुने, प्रकाश बोबडे तर भाजपतर्फे सिनु इसारफ यांनी नामांकन अर्ज दाखल केले. मात्र प्रकाश बोबडे यांनी नामांकन अर्ज मागे घेतले. निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे संतोष नुने यांनी भाजप उमेदवार सिनु इसराफ यांचा १०-७ ने भराव केला. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार संतोष खांडरे, मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी दिलीप पिलई, वरिष्ठ लिपीक राजू येरणे यांनी काम पाहीले.घुग्घूसपासून जवळच असलेल्या व नऊ सदस्य संख्या असलेल्या उसगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे नऊही सदस्य निवडून आल्याने सोमवारी सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक अविरोध झाली. त्यात सरपंचपद खुल्या प्रवर्गसाठी होते. या पदावर धनंजय ठाकरे तर उपसरपंचपदी माया जुमनाके यांची निवड करण्यात आली. (वार्ताहर)