शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

नागभीड येथे काँग्रेसचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:24 IST

नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी गुरूवारी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकºयांचाही सहभाग : गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी गुरूवारी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची सुरूवात माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आली. यावेळी डॉ. अविनाश वारजूकर, जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जि.प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, पं.स. सभापती रवी देशमुख यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेड्यापाड्यातील शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.नागभीड येथील प्रमुख मार्गाने शासनाविरोधात विविध घोषणा आंदोलक देत होते. त्यानंतर येथील राममंदिर चौकात आंदोलनाला अनेकांनी संबोधित केले. केंद्र आणि राज्यात सत्तारूढ असलेले सरकार सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे. या सरकारला फक्त भांडवलदारांचेच हीत जोपासायचे आहे. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकºयांना वेठीस धरले आहे. शासनाच्या धोरणांनी जनता हैरान आहे, असे विविध आरोप या नेत्यांनी आपल्या भाषणातून केला.यानंतर तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी एक शिष्टमंडळाने तहसीलदार यांना विविध मांगण्याचे निवेदन दिले. या मोर्चात जि.प. सदस्य गोपाल दडमल, जि.प. सदस्य नयना गेडाम, न.प. चे काँग्रेस गटनेते दिनेश गावंडे, नगरसेवक शिरीष वानखेडे, पं.स. सदस्य रंजना पेंदाम, श्यामसुंदर पुरकाम, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद बोरकर, पुरुषोत्तम बगमारे, रामकृष्ण देशमुख, नगरसेवक प्रतिक असीन, मोठू पिसे, नासिर शेख व शेतकरी सहभागी झाले होते.