शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून कर्नाटकातील लोकशाही विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:22 IST

काँग्रेसच्या वतीने कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीचा लोकशाही विजय म्हणून चंद्रपूर व बल्लारपुरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळयाजवळ तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिका चौकात फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसच्या वतीने कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीचा लोकशाही विजय म्हणून चंद्रपूर व बल्लारपुरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळयाजवळ तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिका चौकात फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. बल्लारपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा केला.कर्नाटक राज्यात अलिकडे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला सरकार स्थापन करण्याईतपत स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तरीही राज्यपालांनी राजकीय दबावाखाली काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाच्या युतीकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपाला सरकार बनविण्याची संधी दिली. परिणामी दाद मागण्यासाठी काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठवावे, लागले. सर्वोच न्यायालयाने शनिवारी भाजपाला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. यामध्ये बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्री यद्दीयुरप्पा यांना राजकीय घडामोडीत राजीनामा सादर करावा लागला. हा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. असे म्हणून काँग्रेसनी जल्लोष साजरा केला. गांधी चौकातील कार्यक्रमात युवा नेते राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, अशोक नागापूरे, नगरसेवक कुशल पुगलिया, देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, प्रविण पडवेकर आदी उपस्थित होते. तर नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कार्यक्रमात मोहन डोंगरे, घनश्याम वासेकर, निखील धनवलकर, दीपक कटकोजवार, शालिनी भगत, वंदना भागवत, वकार काजी आदी उपस्थित होते. तर बल्लारपूर येथील कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदांनी दिलीप माकोडे, माजी उपाध्यक्ष पवन भगत, देवेंद्र आर्य, अब्दूल करीम, नाना बुंदेल, इस्माईल डाकवाला, नगरसेवक भास्कर माकोडे, अमीत पाझारे, सचिन जाधव, प्राणेश अमराज, ओमप्रकाश कुशवाह, विलास आमटे, सतीश तोटा, यांच्यासह काँग्रेस पदाधिकाºयांची उपस्थिती होते.