शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गोंडसभेच्या अधिवेशनाचा समारोप

By admin | Updated: December 27, 2014 22:48 IST

येथे आयोजित गोंडवाना महासभेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची शनिवारी पारंपरिक रेला नृत्याने सांगता झाली. यात एकूण १३ ठराव मांडून ते पारित करण्यात आले.

बल्लारपूर : येथे आयोजित गोंडवाना महासभेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची शनिवारी पारंपरिक रेला नृत्याने सांगता झाली. यात एकूण १३ ठराव मांडून ते पारित करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिशुपाल शौरी हे होते. मंचावर खासदार नागेश घोडाम, आ. नामदेव उसेंडी, डॉ.के. एम. मैत्री, अंजू सिडाम, देवकुमार नैताम, सोनूब नैताम, आर.एम. धुरिया, महेंद्र नायक, शेरसिह आखेला, दुर्गावती उईके, डॉ. श्रीकांत गोंड, प्रमोदसिंह पोरते, वनमाली प्रसाद, नारायण मरकान, मुर्लीधर टेकाम, विष्णू नैताम यांची उपस्थिती होती. पाहुण्यांनी आपल्या भाषणातून गोंड समाजाच्या ज्या समस्या आणि मागण्या आहेत, त्या प्रभावीपणे मांडल्या. नक्षली हल्ल्यात गोंड आदिवासी समाज बांधवाचे नाहक जीव जात आहे. याबाबत शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टिका करीत नक्षली हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुलांच्या पालन पोषणाची तसेच शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, याकरिता समाज संघटना मदत करू शकते. तदवतच, गोंडी भाषेचे व संस्कृतीचे जतन करण्याकरिता शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे देशभरात गोंडकालीन किल्ले वा गड आहेत, त्याचे जतन शासनाने योग्य प्रकारे करावे. गोंडी समाज बांधवांनी एकोपा ठेवून आपले हक्क शासनाकडून घ्यावे, असे विचार मांडत समाज बांधवांना मार्गदर्शन केले. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अधिवेशनात १३ ठराव मांडण्यात आले. त्यात गोंडी भाषा व संस्कृतीला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, विविध क्षेत्रात वेगवेगळ्या नावाने राहणाऱ्या गोंड समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा, चंद्रपूरला होत असलेल्या मेडिकल कॉलेजला राणी हिराईचे व चंद्रपूर विमानतळाला वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव द्यावे या विषयांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)