शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३६० शेततळ्यांचे काम पूर्ण

By admin | Updated: September 16, 2016 01:40 IST

शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम

चंद्रपूर : शेतकऱ्यांना सहज सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून सुरु केला आहे. शाश्वत आणि हक्काची सिंचन सुविधा देणाऱ्या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी १९६३ शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध करुन दिले जाणार असून आतापर्यंत ३६० शेततळे पूर्ण झाले आहेत. सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहावे लागते. खरीपाच्या मुख्य हंगामातही पावसाने दगा दिल्यास ही पिकेही हातचे जातात. हक्काची सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास खरीपासह अन्य पिकेही शेतकऱ्यांना घेता येवू शकतो. तसेच रब्बी व उन्हाळी पिकेही घेतली जावू शकते. यासाठी सिंचन असणे फार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अनेक पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासोबतच या माध्यमातून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना १७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्याला सन २०१६-१७ या योजनेच्या प्रथम वर्षाकरिता १९६३ इतक्या शेततळयांचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज करावयाचे होते. जिल्ह्यातील ३१२७ शेतकऱ्यांनी शेततळयांसाठी अर्ज सादर केले आहे. अर्जाच्या छाननीनंतर २२१४ तांत्रिक दृष्टया तसेच जागा योग्य असल्याचे आढळून आले. तालुका समितीने लक्षांकानुसार २००३ अर्जांना मंजूरी दिली आहे. शेततळ्यांसाठी शासनाच्या वतीने कमाल ५० हजारापर्यंत अनुदान मंजूर केल्या जाते. समितीने मंजूर केलेल्या अर्जांपैकी १७१६ अर्जदार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्याच्या कामास कायार्रंभ आदेश दिले असून ३६० शेततळे खोदून पूर्ण झाली आहे. जिल्ह्याला दिलेल्या लक्षांकापैकी सर्व शेततळे याचवर्षी पूर्ण होणार आहेत. शेततळे पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची यापूर्वी सुविधा नव्हती, अशा शेतकऱ्यांना सहज शेततळे संजिवनी देणारे ठरणार आहे. शिवाय एकापेक्षा जास्त पिके शेतकरी शेततळयातील पाण्याच्या भरवशावर घेणार असल्याने त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासोबतच जिवनमान उंचावण्यासही मोलाचे ठरणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)