शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत १५ लाख जमा करा

By admin | Updated: September 21, 2015 00:54 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने पंधरा दिवसात १५ लाख रुपये जमा करण्यासाठी शनिवारी नोटीस बजावली आहे.

मनपा गंभीर : उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला नोटीसचंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने पंधरा दिवसात १५ लाख रुपये जमा करण्यासाठी शनिवारी नोटीस बजावली आहे. मुदतीत रक्कम जमा न केल्यास बँक गॅरंटी जप्त केली जाईल, असा इशाराही नोटीसतून देण्यात आला.शहरातील पाणीपुरवठ्याचे कंत्राट उज्ज्वल कंस्ट्रक्शन या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी इरई धरणातील पाण्याची उचल करुन प्रक्रियेनंतर शहराला पाणी पुरवठा करीत असते. मात्र धरणातील पाण्याची उचल केल्यानंतर वापर शुल्क पाटबंधारे विभागाकडे जमा करावे लागते. विधिमंडळात संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानी उचल केलेल्या पाण्याचे वापर शुल्क पाटबंधारे विभागाकडे जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाटबंधारे विभागाकडे रकमा जमा केल्या. पाण्याचे खासगीकरण करणारी चंद्रपूर ही राज्यातील पहिली नगरपालिका होती. त्यानुसार ही रक्कम खासगी पाणीपुरवठा कंपनीने देणे अपेक्षित होते. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने खासगी कंत्राटदारावर मेहेरबानी दाखवत स्वत: १५ लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे जमा केले.त्यानंतर कंत्राटदाराला ही रक्कम मनपाकडे जमा करण्यास सांगितले. परंतु, कंत्राटदारांनी मनपाच्या एकाही पत्राला उत्तर दिली नाही किंवा रकमही जमा केली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने शनिवारी नोटीस बजावून १५ दिवसात १५ लाख जमा करावे, अन्यथा बँक गॅरंटी जप्त करण्यात येईल, असे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)