शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था

By admin | Updated: June 24, 2017 00:41 IST

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम केले.

१८ लाखांचा खर्च : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम केले. परंतु कामातील त्रुट्यांमुळे केवळ वर्षभरातच हा बंधारा निरूपयोगी ठरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. पण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व अनास्थेमुळे अनेक हितोपयोगी अभियानाची पुरती वाट लागत आहे. असाच एका विभागाच्या नाकर्तेपणा उघड्यावर आला आहे. येथील जिल्हा परिषद लघुसिंचाई विभागाने मागील वर्षी शहरालगत १८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. परंतु नियोजनशून्य काम व तांत्रिक बाबी धाब्यावर बसविण्यात आल्याने वर्षभरातच हा बंधारा निकामी ठरला आहे. त्यामुळे या प्रकारणाची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे.लघुसिंचन विभागाच्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्याचे तीन पिलर बाहेर निघाले. पिल्लरचे काम एकाच रेषेत नसल्याने कामात कुठेही सुसूत्रता दिसत नाही. लोखंडी सळाखीचा अल्पवापर करण्यात आला आहे. नियोजनबद्ध ढुलाई अभावी अनेक सळाखी उघड्यावर पडल्या आहेत. सोबतच क्युरिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हा बंधारा एका वर्षात कुचकामी ठरला आहे. बंधाऱ्याची बाजूची भिंत अक्षरश: कोसळली आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूची अंदाजे १५ ते २० फूट जमीन खोदल्या गेली आहे. अंदाजपत्रकातील दिशानिर्देश व तांत्रिक बाबीला केराची टोपली दाखविण्यात आल्याने निधीचा चुराडा झाला आहे. या बंधाऱ्याच्या दुरवस्थेला विभागाचे अभियंते जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. एका वर्षातच बंधारा स्वाहा झाला असतानाही अभियंत्यांना मात्रो या कामाचे काही देणेघेणे नसल्याचा प्रत्यय आला आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेतून काम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत शहरालगत पेट्रोलपंपाच्या मागे १८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. बंधाऱ्यात साचलेल्या पाण्यातून परिसरातील शेती सुजलाम - सुफलाम होईल. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, ही अपेक्षा होती. पण अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे १८ लाखांच्या निधीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. काम सुरु करण्यात आल्यावर सर्व जबाबदारी कंत्राटदारावर सोपवून अभियंत्यानी बंधाऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने आपल्या सोईनुसार काम केले.