शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा घोटाळ्याची सखोल चौकशी करावी

By admin | Updated: December 27, 2014 22:48 IST

महाऔष्णिक वीज केंद्रात कोळशाच्या ट्रकमध्ये माती मिळाल्याने कोळसा घोटाळा उघडकीस आला. याबाबत सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रात कोळशाच्या ट्रकमध्ये माती मिळाल्याने कोळसा घोटाळा उघडकीस आला. याबाबत सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली. यासंदर्भात त्यांनी येथे शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.येथील हिराई विश्रामगृहात महाऔष्णिक वीज केंद्राचे केंद्राचे मुख्य अभियंता बुरुडे यांची भेट घेतली. कोळशाची आवक, वाहतूक, देखभाल, गुणवत्ता नियंत्रण याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. माती नेण्याचा आत्मविश्वास चालकामध्ये येणे म्हणजेच कोळसा घोटाळ्याचे स्वरूप व्यापक असल्याचा पुरावा आहे. केवळ एक ट्रकपर्यंत चौकशी मर्यादीत न ठेवता यापूर्वी मिळालेल्या कोळसा, त्यातून निर्माण झालेल्या विजेचे प्रमाण या सर्व गोष्टीपासून कोळसा घोटाळ्याच्या खोलात जाण्याच्या तसेच यामध्ये गुंतलेल्या महाजनकोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना आमदार कडू यांनी मुख्य अभियंत्यांना दिल्या.यावेळी चंमऔविनी केंद्र (प्रकल्प) चे मुख्य अभियंता खोकले सुद्धा उपस्थित होते. विस्तारीत युनिट ८ व ९ च्या उभारणीत दोन पटीने जास्त कालावधी लागत आहे. बीजीआर कंपनीच्या दोषपूर्ण कार्यशैलीमुळे या प्रकल्पाच्या उभारणीत विलंब होत आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पामध्ये सिव्हीलची अनेक कामे निकृष्ट दर्जाची असून अपघातांमध्ये दगावलेल्या कामगारांची संख्या चिंताजनक आहे. कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन न करणे, गेटपास नसलेल्या कामगारांना पैसे घेऊन प्रवेश देणे, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक बाबी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार कडू यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर वेळीच उचित कारवाई करण्याचे निर्देश आमदार कडू यांनी दिले. या बैठकीमध्ये प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)