शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा सीईओंना घेराव

By admin | Updated: October 1, 2015 01:23 IST

आयटकच्या नेतृत्वात चर्चेसाठी आलेल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांशी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने ते याबाबत सीईओंकडे चर्चा करण्यास गेले.

चंद्रपूर : आयटकच्या नेतृत्वात चर्चेसाठी आलेल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांशी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने ते याबाबत सीईओंकडे चर्चा करण्यास गेले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी आयटकच्या शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करताच निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्माऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सीईओंना घेराव घालून त्यांचे वाहन अडविले आणि चर्चा करण्यास भाग पाडले.प्रशासनाने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील दोन वर्षापासून सोडविल्या नाहीत व चुकीच्या पद्धतीने कामावरुन कमी केलेल्या कामगारांना अद्यापही कामावर घेण्यात आलेले नाही. तत्कालीन सीईओ सलील यांनी सर्व कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दोन वर्षापूर्वीच दिलेले होते. परंतु मुख्याध्यापकांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही व कामगारांना कामावर घेतले नाही. त्यामुळे सीईओंच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने सर्व कामगारांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेत चर्चेसाठी यावे व त्यामध्ये तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. परंतु पदाधिकारी चर्चेसाठी आले असताना खोटे कारण देऊन शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी काही एक चर्चा न करता सभा तहकूब केली. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सीईओंची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविले. यासाठी सीईओंना पत्र पाठविले, परंतु सीईओ हे चर्चेसाठी बोलावणी न करताच बाहेर जाण्यासाठी निघाले असता कामगारांनी सीईओंच्या गाडीला घेराव घालून त्यांचे वाहन अडविले आणि चर्चा करण्यास भाग पाडले. शेवटी सीईओंनी जवळजवळ अर्धा तास चर्चा केली. परंतु अद्यापही तोडगा निघालेला नाही. सदर चर्चेकरिता आलेल्यांमध्ये म.रा. शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, संतोष दास आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)