शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थ‍ितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थ‍ितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिंग डोमेस्टिक वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्यात येत आहे. याकरिता शासनातर्फे मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून सदर प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भय्याजी येरमे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत कन्नाके, तसेच खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालये (२० पेक्षा अधिक बेड असलेले) वैद्यकीय शिक्षण संस्था यांची ग्रीन चॅनलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (व्हीटीआय) म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.० या अंतर्गत व्हीटीआय इमर्जन्सी मेडिकल, तंत्रज्ञ, जनरल ड्यूटी असिस्टंट (जीडीए), जीडीए ॲडव्हान्स, गृह आरोग्य सहाय्यक, वैद्यकीय उपकरणे तंत्रज्ञान सहाय्यक या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. राज्य शासनातर्फे ३६ अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येणार असून वैद्यकीय सुविधांची ने-आण करण्यासाठी वाहन चालक व ॲम्ब्युलन्स वाहनचालक या पदाचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना किमान ६ महिने शासकीय किंवा खासगी रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असेल. उमेदवारांना सदर प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून याद्वारे जिल्ह्यामध्ये कोरोना योद्ध्यांची मोठी साखळी निर्माण करण्यास मदत होत आहे.