शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी शाळांचे साडेतीनशे संगणक बंद

By admin | Updated: October 24, 2016 00:51 IST

ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून...

जिल्हा परिषद शाळांतील स्थिती : पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्षचंद्रपूर : ई-लर्निंग या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना संगणक वितरीत करून तेथील विद्यार्थ्यांना संगणकीय धडे देण्याचे काम प्रशासनस्तरावरून सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ९०० शाळांना संगणक वितरीत करण्यात आले. मात्र संगणक व्यवस्थापनासाठी निधीची तरतुद करण्यात न आल्याने तब्बल ३५० संगणक शाळांमध्ये बंद अवस्थेत पडले आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी जिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविण्याचे काम सुरू आहे. यातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे दिले जात आहेत. मात्र संगणकात बिघाड झाल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी निधीची तरतुदच करण्यात आलेली नाही. परिणामी जिल्हाभरातील शाळांमध्ये तब्बल ३५० संगणक बंद पडून असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद शाळांमधील रोडावलेली विद्यार्थी संख्या दूर करण्यासाठी खासगी शाळांसारख्या सोयीसुविधा देण्याचे काम जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना ९०० संगणक वाटप करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासनाचे कोट्यवधी रुपयाचे अंदाजपत्रक आहे. यातून लोकपयोगी विविध योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात येते. मात्र अनेक विभागाचा निधी दरवर्षी अखर्चित असते. ज्यासाठी निधीची तरतुद आवश्यक आहे, अशा कामांसाठी निधीची तरतुद होत नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धुळखात पडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)दुरूस्तीचा प्रश्नवाटप करण्यात आलेले संगणक काही वर्षे सुस्थितीत होते. मात्र, आता यातील अनेक संगणक लहानसहान कारणांमुळे बंद पडले आहेत. संगणकांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने निधीची तरतुदच केलेली नाही. बिघाड झालेल्या संगणकाची दुरुस्ती तरी कशी करायची, असा प्रश्न शाळांतील मुख्याध्यापकांना पडला आहे.