शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेला स्पष्ट बहुमत

By admin | Updated: March 9, 2016 02:03 IST

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

वरोरा : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. शिवसेनेने ही निवडणूक प्रथमच लढवित १८ जागांपैकी १४ जागांवर आपले संचालक निवडून आणत आजपावेतो काँग्रेस व भाजपाच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर शिवसेनेने कब्जा मिळविला आहे. या निमित्ताने सहकार क्षेत्रात शिवसेने वरोरा तालुक्यात प्रथमच प्रवेश केला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, भाजपा व शिवसेना या पक्षानी प्रतिष्ठेची करीत राजकीय पक्षांनी आपले १८ ही जागेवर उमेदवार उभे केले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षे इंदिरा काँग्रेसच्या ताब्यात राहिली. काही वर्षे शेतकरी संघटनेनेही आपल्या ताब्यात घेतली होती. इंदिरा काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर काही महिने बाजार समितीवर भाजपाच्या संचालकांनी ताबा घेतला होता. बाजार समितीच्या ६ मार्च रोजी १८ जागांकरिता मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल ७ मार्च रोजी वरोरा शहरातील नगरभवनमध्ये जाहीर करण्यात आला. त्यात शिवसेनेचे सेवा सहकारी गटातून दत्ता बोरेकर, अशोक सोनटक्के, राजू आसुटकर, संजय घागी, योगेश खामनकर, बंडू शेरकी, किशोर भलमे, संगीता ठाकरे, ग्रामपंचायत गटातून राजेंद्र चिकटे, देवानंद मोरे, हरिदास जाधव, विशाल बदखल, व्यापारी अडतेमधून निरज गोठी, चंद्रकुमार जयस्वाल तर काँग्रेसचे डॉ. विजय देवतळे, गुणवंत भोयर, सुनंदा जीवतोडे विजयी झाले. हमाल मापारी मतदार संघातून पांडूरंग झाडे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ १५ झाले आहे. आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्त्वात वरोरा शहरातून रॅली काढण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)