शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांकडून शहर स्वच्छतेचा आढावा

By admin | Updated: May 17, 2017 00:42 IST

महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर यांनी शहर स्वच्छतेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर यांनी शहर स्वच्छतेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.या संदर्भात आयोजित सभेला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेते वसंत देशमुख, अनिल रामटेके, नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख, सुरेश पचारे आदी उपस्थित होते. महापौर यांनी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शहरातील कोणकोणत्या मुख्य नाल्याची सफाई करण्यात आली, याची संपूर्ण माहिती तीनही झोन अधिकाऱ्यांना व स्वच्छता निरीक्षकांना मागितली. त्यानंतर अजूनही कोणत्या नाल्याची सफाई झालेली नाही व का झालेली नाही, याबाबत संबंधित स्वच्छता निरीक्षकांना जाब विचारण्यात आला. ज्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही, त्याची सफाई तात्काळ करण्याचे निर्देश महापौर यांनी दिले. सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस जवळ असल्याने शहरातील सर्व नाल्याची सफाई करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहरातील मुख्य नाले व लहान नाल्यांची सफाई करण्याचे निर्देश दिले. तसेच शहर स्वच्छतेसाठी व्हॅक्युम क्लीनर मशिन घेण्याचे निर्देश महापौर यांनी अधिकाऱ्यांना दिले. अनेक नागरिक रस्त्यावर गिट्टी, रेती, विटा व इतर बांधकाम साहित्य ठेवतात. अशा नागरिकांवर दंड आकारण्यात यावे, असे निर्देश घोटेकर यांनी दिले. या सभेत सदस्यांनी आपापल्या प्रभागातील स्वच्छतेबाबत अडचणी सांगितल्या. नाल्या सफाई करताना काही भागात नाल्यात अतिक्रमण करण्यात आले असल्याने सफाई करताना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती सदस्यांनी दिली. तसेच मनुष्यबळ कमी असल्याने सफाईच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे या सभेत सदस्यांनी सांगितले. सभापती यांनी आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी मशिन लावून सफाई करावी, अशी सूचना यावेळी मांडली.