शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नगर स्वच्छता व देखाव्यांनी महोत्सवाची दमदार सुरुवात

By admin | Updated: January 3, 2016 01:23 IST

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कल्पनेतून ‘ब्रह्मपुरी महोत्सव २०१६’ चे आयोजन होत आहे.

ब्रम्हपुरी महोत्सव : संपूर्ण शहरातच आनंदाचे वातावरणब्रह्मपुरी : आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कल्पनेतून ‘ब्रह्मपुरी महोत्सव २०१६’ चे आयोजन होत आहे. या महोत्सवाची नगर स्वच्छतेने व आकर्षक देखावे काढून शनिवारी दमदार सुरुवात करण्यात आली. या महोत्सवामुळे ब्रह्मपुरीत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.महोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता ख्रिस्तानंद चौकातून शहराच्या मुख्य मार्गाची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात लोकप्रतिनिधी, समाजसेवक, अधिकारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नेवजाबाई हितकारिणी स्कूल, ख्रिस्तानंद स्कूल, हिंदू ज्ञान मंदिर व डॉ.पंजाबराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहर स्वच्छतेला सुरुवात केली व शहराचे प्रमुख मार्ग झाडून कचरा गोळा करून नगर परिषद यंत्रणेच्या माध्यमातून कचरा शहराबाहेर वाहून नेण्यात आला. नगरस्वच्छता अभियानात आमदार विजय वडेट्टीवार, नगराध्यक्ष रिता उराडे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, पोलीस उपविभागीय अधिकारी रिमा जनबंधू व इतर अधिकारी, लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.दुपारी २ वाजता शहराच्या प्रमुख मार्गानी रॅली काढण्यात आली. यात विविध देखावे साकारण्यात आले होते. रॅलीमधील बेटाळा पॉलिटेक्निक महाविद्यालायाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य, ख्रिस्तानंद स्कूलचा स्वच्छता संदेश देणारा देखावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे बेटी बचाओ रॅली, घोड्यांची वरात, लोकमत सखी मंच, सांझ विहार ग्रुपचा विशिष्ठ पेहराव देखावा, दिंडी, आदिवासी नृत्य नागरिकांना आकर्षित करीत होते. रॅलीची सांगता महोत्सव ठिकाणी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)