शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:01 IST

शहरातील भांदक चेक पोस्ट जवळील बीएसएनएलच्या संरक्षण भिंतीलगतच्या छत्रपती ले आऊटमधील स्रेहल तथा गौतम नगरला लागून असलेल्या झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले आहे.

ठळक मुद्देनागरिकांत दहशत : रॅपिड अ‍ॅक्शन पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील भांदक चेक पोस्ट जवळील बीएसएनएलच्या संरक्षण भिंतीलगतच्या छत्रपती ले आऊटमधील स्रेहल तथा गौतम नगरला लागून असलेल्या झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले आहे.बुधवारी रात्री ९ वाजता ताडाळी भागातून हा पट्टेदार वाघ अचानक आला. गुरुवारी सकाळी अनेकांना वाघाचे दर्शन झाले. वाघाच्या या धुमाकूळाने परिसरातील तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली होती. शेवटी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांच्या मार्गदर्शनात टायगर रॅपीड अ‍ॅक्शन, फॉरेस्ट कमांडो पथक वनविभागाच्या अधिकारी व चमूने तसेच इको - प्रोच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पट्टेदार वाघााला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. यावेळी भद्रावती शहरातील नागरिकांनी पट्टेदार वाघाला पाहण्यास मोठी गर्दी केली होती.गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलीस, आयुध निर्माणी चांदाचे डी.एस.सी. जवान पथक व चंद्रपूरच्या दंगा नियंत्रण पथकाच्या दोन वाहनांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान आयुध निर्माणीचे कर्नल, जिल्हा वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे ठाणेदार बी. डी. मडावी, एसटीपीएफ प्रमुख योगिता मडावी, वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार हे याठिकाणी दाखल झाले होते.सदर पट्टेदार वाघ हा सीटीपीएस क्षेत्रातील वाघिणीच्या ४ पिलांपैकी एक असून तो ताडाळी धारीवाल पावर प्रोजेक्टकडून गोरजा तलाव, कोंढाळी या गावांकडून रेल्वेच्या टॅक मार्गाने मोहबाळा, पॉवर ग्रिड भागातून शिकारीच्या शोधात आला असावा, असा अंदाज महेशकर यांनी वर्तविला. या वाघाचे वय अंदाजे २ वर्षाचे असल्याचे सांगण्यात आले.सकाळी ६ वाजतापासून भद्रावती क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक हनवते, कांबळे, इको प्रोचे संदिप जिवणे, शुभम मेश्राम, ओमदास चांदेकर, विलास येरणे, श्रीपाद भाकरे, आदींनी वाघाला पळविण्यास सहकार्य केले. मात्र अद्याप वाघ त्याच परिसरात आहेआला त्याचे मार्गाने जाणारवाघाच्या जाण्याची चाहुल लक्षात घेता आलेला पट्टेदार नर प्रजातीचा वाघ आला, त्या मार्गानेच मार्गक्रमण करीत जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर यांनी सांगितले. तरीही वाघाच्या हालचालीवर वनविभागाची चमू नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग