शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

त्या गावातील नागरिक बनतात एक दिवसाचा गुराखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST

चिमूर : तालुक्यातील खंडाळा गावातील नागरिकांनी गावातील ज्यांची गुरे आहेत त्या सर्वांनी एकेक दिवस आळीपाळीने गुरे चारण्यासाठी जंगलात जाण्याचा ...

चिमूर : तालुक्यातील खंडाळा गावातील नागरिकांनी गावातील ज्यांची गुरे आहेत त्या सर्वांनी एकेक दिवस आळीपाळीने गुरे चारण्यासाठी जंगलात जाण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. खंडाळा गावातील गोधनांना मिळणाऱ्या चांगल्या चाऱ्यामुळे गोधनात वाढ झाली. शिवाय गोधन सुदृढ होऊन दुधामध्ये वाढ झाल्याचा दावा केला जात आहे.

चिमूरपासून अठरा किलोमीटर अंतरावर चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर खंडाळा गाव असून लगत जंगल व्याप्त परिसर आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेतीसह, दूध, दही, तूप विकून उपजीविका भागवणारी कुटुंबे आहेत. मात्र, दिवसागणिक गाईंच्या राखणीत झालेली वाढ, न मिळणारे गुराखी यामुळे गावातील अनेकांनी गोधन विक्रीस काढले. यामुळे गावातील गोधनाची संख्या कमी झाली. याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर झाला होता.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित किशोर गुरले या युवकाने गावात गुरुदेवांच्या प्रार्थनेनंतर गोपालक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून यावर उपाय शोधला. गावात असलेल्या गोमालकांनी आळीपाळीने गावातील सर्व गाई चरण्यासाठी जंगलात नेण्याचे ठरविले. या उपक्रमाला गावातील गोमालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आजघडीला ४० गोपालक आळीपाळीने गाई चारण्यासाठी जंगलात जातात. या उपक्रमात एका दिवशी दोन जणांची पाळी लावण्यात आली आहे. एखाद्याला त्या दिवशी काम असल्यास बदली व्यक्ती त्याचे काम करतो.

एक दिवसाचा गुराखी या उपक्रमामुळे गाई हरविणे, वाघाचे भक्ष्य बनण्यापासून रक्षण झाले आहे, सोबतच गाईंना पोटभर चारा मिळण्यास मदत झाली तर महिन्याकाठी राखदारीचा खर्चही वाचला. या उपक्रमात ४० कुटुंबे सहभागी झाली आहेत. यामुळे गोधनाच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. एक दिवसाचा गुराखी उपक्रम तालुक्यातील केसलाबोडी व वर्ध्यातील ताडगाव या गावात सुरू करण्यात आला आहे.

कोट

एक दिवसाचा गुराखी या संकल्पनेमुळे गावातील गोपालकांच्या महिन्याच्या राखणीच्या पैशात बचत झाली, गुरांची काळजी दूर होऊन गावातील गोधनात वाढ झाली आहे.

किशोर गुरले, गोपालक, खंडाळा, ता चिमूर.

230821\img_20210823_123729.jpg

खंडाळा येथील एक दिवसाचा गुराखी बनून जंगलात गुरे चरताना