शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’ला नागरिकांचा प्रतिसाद

By admin | Updated: April 26, 2016 00:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वरोरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना मार्गदर्शन केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा कार्यक्रम बघण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर ग्रामस्थांसोबत आनंदवन ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित होते. ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधला. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला पाहता किंवा ऐकता यावा, याकरिता ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम बघण्याकरिता नागरिक दुपारी ३ वाजता उपस्थित झाले. हा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थांसोबत बघितला. त्यानंतर आनंदवन ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती वर्ष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील नागरकांना मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व स्वच्छता तसेच पाण्याचे महत्त्व विषद केले. ना.हंसराज अहीर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून हा कार्यक्रम ग्रामस्थांसोबत बघितला. या कार्यक्रमाबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्स्कुता दिसून आली. या कार्यक्रमामुळे पंचायत राज नितीला चालना मिळणार असल्याचे मत याप्रसंगी ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. यावेळी आनंदवन ग्रामपंचायतीचे सरपंच काशिनाथ मेश्राम, माजी सरपंच राजु सावसाकडे, भाजपा तालुका संघटक ओम मांडवकर, रवी नागपुरे, रविंद्र कष्टी, आनंदवन ग्रामपंचायतीचे सदस्य तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच तहसीलदार राजेश मांडवकर, सवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, विस्तार अधिकारी एन.ए. नागतोडे, आस्कर, खुजे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)