शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत वितरण अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

By admin | Updated: September 14, 2015 00:48 IST

येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या .....

मेंडकी : येथील तसेच परिसरातील गावखेड्यातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत असल्याने त्रस्त झालेल्या मेंडकी तसेच परिसरातील जनतेने विद्युत वितरण अभियंत्यांना घेराव घातल्याचा प्रकार मेंडकी येथे घडला आहे.मेंडकी विद्युत वितरण कंपनी कार्यालयाअंतर्गत कळमगाव, जबराबोडी मेंढा, एकारा, रानबोथली अशा बऱ्याच गावखेड्यांचा परिसर येत येतो. मेंडकी तसेच परिसरातील वीज पुरवठा ७ आणि ८ सप्टेंबरला दोन दिवस खंडीत झाला होता. येथील विद्युत वितरण कार्यालयाचे अभियंता दिनेश झोडापे यांना मेंडकी तसेच परिसरातील काही नागरिकांनी येथील विद्युत पुरवठा खंडीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरी येथे वास्तव्याने राहत असल्याने ‘होय आपण मेंडकीला येऊनच राहिलो आहे, काही वेळातच विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे मोबाईलवरुन काही नागरिकांना सांगितले. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने कळमगाव, जवराबोडी मेंडा, मेंडकी येथील जवळपास १०० ते २०० लोकांनी रात्री ८ वाजता मेंडकी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एकत्र येऊन अभियंता दिनेश झोडापे यांना विद्युत पुरवठा सुरू का झाला नाही, याबाबत मोबाईलवर विचारणा केली असता अभियंता दिनेश झोडापे यांनी उडवा-उडवीचे उत्तरे देवून टाळाटाळ करून फोन ठेवून दिला. त्यानंतर परत पुन्हा अभियंता दिनेश झोडापेंना फोन केला असता विद्युत पुरवठा आता सुरू होऊ शकत नाही, असे सांगितले. त्रस्त झालेल्या लोकांनी अभियंता दिनेश झोडापे यांना तुम्हाला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करायचा आहे की नाही, नसेल करायचे तस सांगा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, असे ठणकावून सांगितले. अभियंता दिनेश झोडापे हे ब्रह्मपुरीवरुन आपल्या कर्मचाऱ्यासोबत रात्री ११ वाजता कार्यालयाजवळ येताच त्रस्त झालेल्या १०० ते २०० लोकांनी अभियंत्यांना घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती केली. हे प्रकरण अधिक तापले असतानाच मेंडकी येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले.त्यानंतर सदर प्रकरण शांत झाले. त्यानंतर मेंडकी येथील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खैरकर आणि त्यांचे कर्मचारी तसेच मेंडकीचे उपसरपंच यशवंत आबोरकर व जवराबोडी मेंडा, कळमगाव मेंडकी येथील उपस्थित लोकांनी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी पहाटेच्या ४ वाजतापर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)