शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जल सप्ताहात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:41 IST

राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासन करीत आहे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : १६ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताह चंद्रपूर : राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासन करीत आहे. मात्र पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नसून यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून १६ ते २२ मार्चदरम्यान जल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत शासकीय विभागप्रमुखांची बैठक शुक्रवार पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जी. मो. शेख, कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. सोनुने व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या सप्ताहात शाळा, महाविद्यालय, गाव, ग्रामपंचायतस्तरावर जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून पाणी व पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६ ते २२ मार्च या सप्ताहात जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करुन पाणी वाचवाचा संदेश देण्यात येणार आहे. जल सप्ताह केवळ शासनाचा उपक्रम नसून तो जनतेचा उपक्रम आहे. या उपक्रमात जिल्हावासीयांनी सक्रिय सहभाग घेऊन पाणी बचतीचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पाण्याविषयी कथाकथन, कविता वाचन, लघुनाटय, जलसाहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये जलजागृती करण्यात येणार आहे. पाणी, पाण्याची गुणवत्ता, स्थानिक सिंचन प्रकल्प, सिंचन व्यवस्थापन यंत्रणा व त्यांची कार्यपध्दती याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय यामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावोगावी पाण्याचे महत्त्व पटवून देणारे मेळावे, कीर्तन व पथनाट्य आयोजित करुन जल जागृती करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.जल सप्ताहाचा एक भाग म्हणून वॉटर रन किंवा जल दौड आयोजित केली जाणार आहे. ही अभिनव कल्पना असून आपल्या कॉलनीत, शाळेत, महाविद्यालयात जल दौडचे आयोजन करुन पाणी वाचविण्याचा संदेश, पाण्याचा जपून वापर करणे व पाण्याचे महत्त्व समजावून सांगता येईल.शासनाच्या या जल सप्ताहात सर्वांनी सहभागी झाल्यास पाणी बचतीचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी बचतीचे विविध कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)