शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अनिल मडावी मृत्यूप्रकरणाची सीआयडी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुलाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मारहाणीत झाल्याची तक्रार विरूर पोलिसात करून, मृतदेह घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देमृतकाच्या आई व बहिणीसह ‘त्या’ तीन साक्षीदारांचा घेतला जबाब, रेल्वे पोलीस गोत्यात

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील विरूर (स्टेशन) येथील अनिल मडावी युवकाचे रेल्वे पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरण आता गंभीर वळणावर आले आहे. दोन दिवसांपासून मुंबईहून आलेले सीआयडीचे पथक  तपासात गुंतले आहे. शनिवारी या पथकाने विरूर स्टेशन येथे मृतकाच्या आई व बहिणीसह रेल्वे पोलिसांनी धरून नेलेल्या युवकांचे जबाब नोंदविल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुलाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मारहाणीत झाल्याची तक्रार विरूर पोलिसात करून, मृतदेह घेण्यास नकार दिला. यानंतर, राजुराचे माजी आमदार ॲड.संजय धोटे आणि राज्याचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओ‌ळखून गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. गृहमंत्र्यांनी मुंबईहून राजलक्ष्मी शिवणकर यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय पथक पाठवून चौकशी सुरू केली आहे. आज हे पथक विरूर स्टेशन येथे पोहोचले. दरम्यान, मृतक अनिलची आई विमल मडावी व त्याच्या बहिणीची विचारपूस केली, तसेच रेल्वे पोलिसांनी अनिल मडावीसोबत गावातील तीन जणांनाही सोबत नेले होते. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. या तीनही युवकांचे जबाब या पथकाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे पथक बल्लारपूर पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. तेथे पोलिसांकडून काही चौकशी केल्याचे समजते. या प्रकरणात रेल्वे पोलीस कोठडीत अनिल मडावीचा मृत्यू झाल्याने व त्याच्या सोबतच्या तरुणांना कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याने, रेल्वे पोलीस गोत्यात येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

नियम असा आहे की, कोठडीतील मृत्यू हे गंभीर प्रकरण मानले. कोठडीतील मृत्यू झाल्याचे कळले, तर अधिवेशन थांबविले जाते. आधी कोठडीतील मृत्यूवर चर्चा होते. कोठडीत उद्या कोणी कोणालाही मारू शकते. यासाठी हा नियम आहे. रेल्वे पोलीस कोठडीत झालेल्या अनिल मडावी मृत्युप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. त्याच अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे.- आ. सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती प्रमुख, म.रा.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार