शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस्अ‍ॅपमुळे चिमुरडा आदित्य सुखरूप घरी परतला

By admin | Updated: July 1, 2015 01:16 IST

दुर्गापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून हरविला चिमुरडा आदित्य दुर्गापूर मेजरगेट परिसरात रडत इकडे तिकडे फिरत असताना रिक्षा चालकाने त्याला पोलिसांकडे नेले.

चंद्रपूर: दुर्गापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून हरविला चिमुरडा आदित्य दुर्गापूर मेजरगेट परिसरात रडत इकडे तिकडे फिरत असताना रिक्षा चालकाने त्याला पोलिसांकडे नेले. हरविलेल्या आदित्यचे आई-वडील सापडावे म्हणून ठाणेदारांनी हा संदेश व्हाटस्अ‍ॅपर टाकला. प्रसिद्धी माध्यमांनीही यासाठी सहकार्य केले आणि दोन तासात चिमुरडा आदित्य आपल्या आई-वडिलांपर्यंत पोहचला.त्याचे असे झाले, दुर्गापूर येथील समता वॉर्डातील अविनाश मुंडे यांचा पाच वर्षीय मुलगा मंगळवारी सकाळी शाळेतून हरविला. तो भटकत भटकत दुर्गापूर मेजरगेटजवळ पोहोचला. त्याला घर सापडेना. त्यामुळे तो गांगरून गेला. रडायला लागला. ही बाब आॅटोरिक्षा चालक कनिलाल ढोक यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला जवळ घेत विचारपूस केली. पण तो स्वत:चे नाव सांगण्यासही असमर्थ होता. त्यामुळे कनिलाल यांनी त्याला सोबत घेतले. त्याच्या घराचा शोध घेतला.मात्र आदित्य बोलतच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला. अखेर कनिलाल यांनी दुर्गापूर पोलीस ठाणे गाठून आदित्यबद्दल माहिती दिली. ठाणेदार संपत चव्हाण यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच एक हरविलेला मुलगा सापडला असल्याचा संदेश व्हॉटस्अ‍ॅपच्या विविध गु्रपवर टाकला. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्या वृत्तवाहिनीनेदेखील मुलगा सापडल्याचे माहिती प्रसारित केली. याचदरम्यान, आदित्यचे वडिल अविनाश मुंडेंना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आदित्य सापडल्याची माहिती मिळाली ते लगेच ठाण्यात पोहचले. सर्वांचे मनापासून आभार मानत त्यांनी आदित्यला जवळ घेतले. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांच्या सहकार्यामुळेच आदित्य त्याच्या आई-वडिलांपर्यंत सुखरूप पोहचला, अशा प्रतिक्रिया ठाणेदार संपत चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.(प्रतिनिधी)