शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकली वनोद्यानात बंदिस्त, फुले तोडण्याची शिक्षा!

By admin | Updated: August 29, 2016 01:18 IST

चवथ्या इयत्तेतील एका चिमुकली विद्यार्थिनीला फुलांचा मोह रविवारी महागात पडला आहे. वनोद्यानातील फुले तोडल्याने तिला दोन तास तेथे बंदिस्त ठेवण्यात आले.

ुबी.यू. बोर्डेवार  राजुराचवथ्या इयत्तेतील एका चिमुकली विद्यार्थिनीला फुलांचा मोह रविवारी महागात पडला आहे. वनोद्यानातील फुले तोडल्याने तिला दोन तास तेथे बंदिस्त ठेवण्यात आले. या संतापजनक प्रकाराने वन समितीने समर्थन करीत तिला शिक्षा फर्मावली.रविवार असल्याने शाळेच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील स्टेला मॉरिस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी तेजस्विनी दिलीप वैरागडे ही आपल्या वडिलांसमवेत सकाळी ९.३० वाजता राजुरा येथील वनोद्यानात गेली होती. तेथे बागडत असताना विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी तेजस्विनीचे मन आकर्षित झाले. तिचे वडील दिलीप वैरागडे यांनी तिला आधीच फुले न तोडण्याबाबत बजावले. परंतु बाल मनाला फुले भुरळ घालत होते.तेजस्विनीला शाळेतील शिक्षिकेने फुलांचे प्रोजेक्ट करण्यास सांगितलेले होते. आपल्या शिक्षिकेने सांगितलेला प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तिला उद्यानातील फुले तोडण्याचा मोह आला. तिने उद्यानातील काही फुले तोडली. ही बाब उद्यानातील कर्मचाऱ्याला समजली. कर्मचाऱ्याने ही प्रकरण वनसमितीकडे नेले. वन समितीच्या मते मुलीने उद्यानातील फुले तोडल्यामुळे उद्यानाचे नुकसान झाले. त्याकरिता नुकसान भरपाई म्हणून २०० रुपयांची मागणी तेजस्विनीचे वडील दिलीप वैरागडे यांच्याकडे करण्यात आली. पैसे न दिल्यास मुलगी उद्यानात ठेवण्याचे फर्माविण्यात आले.वन समितीच्या नुकसान भरपाईच्या मागणीमुळे दिलीप वैरागडे संतप्त झाले. त्यांनी रागाच्या भरात मुलीला उद्यानात ठेवून घरी परत आले. त्यांच्याकडे २०० रुपयांची रक्कम नसल्याने हा निर्णय घेतला. त्यांनी मुलगी वनोद्यानात बंदिस्त असल्याची बाब नगरसेवक प्रा. अनिल ठाकुरवार यांना कळविली. त्यांनी ही घटना ‘लोकमत’ला सांगितली. त्यानंतर वनोद्यानात चौकशी केली तेव्हा तेजस्विनी एकटीच तेथे बसून असल्याचे आढळले. याप्रकरणी नगरसेवक प्रा. ठाकुरवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.वनोद्यानासाठी हैदराबाद येथून विविध जातीची झाडे आणली आहेत. मुलीने फुले तोडली असल्याने २०० रुपये नुकसान भरपाई मागितली. परंतु तिच्या वडिलाने पैसे आणतो, असे सांगून मुलीला उद्यानात बसवून ठेवले.- मारोती शिवनकर, सदस्य, वनसमिती वनोद्यान राजुरा.