शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मजूर सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिव मोकाटच

By admin | Updated: April 15, 2016 01:21 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे बोगस मजूर सहकारी संस्था स्थापन करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला.

दोन महिन्यांपासून प्रतीक्षा : तक्रार करूनही दखल घेण्यास चालढकलपोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे बोगस मजूर सहकारी संस्था स्थापन करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला. संस्थेअंतर्गत लाखो रुपयाची कामे करुन स्वहित जोपासणारे संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिवावर कार्यवाही करावी, यासाठी अन्यायग्रस्त सभासदांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. मात्र अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ते मोकाटच आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळणार काय, असा गंभीर प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांनी केला आहे.देवाडा खुर्द येथील साईकृपा मजूर सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक रुमाजी कवडू बुरांडे, त्यांचेच जावई सचिव संतोष नैताम, भाऊ पुंडलिक बुरांडे यांनी गावातील २८ सभासदांची बोगस नोंदणी करुन सन २०१०-११ मध्ये मजूर सहकारी संस्थेची स्थापना केली. वास्तविकता संस्थेची नोंदणी करताना सभासदांना विचारात घेणे आवश्यक होते. मात्र सभासदांना कुठलीच माहिती न देता परस्पर त्यांच्या नावाचे बीपीएल दाखले व त्यांच्या नावासमोर त्रयस्थ व्यक्तींचे पासपोर्ट लावून त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन बोगस संस्थेची स्थापना केली. यातील काही सभासद रोजगारासाठी बाहेरगावी राहतात तर काही मय्यत आहेत. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबामध्ये दारिद्र्याचे जीवन जगणाऱ्या मजूर, अंगमेहनती व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून शासनाने ग्रामीण परिसरामध्ये मजूर सहकारी संस्थेला मान्यता दिली. परंतु, राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या व्यक्तींनी शासनाच्या या चांगल्या उद्देशाला हरताळ फासून सार्वजनिक बांधकााम विभागामार्फत ८० लाख रुपयाच्यावर कामे करुन यातून लाखो रुपयाची माया जमवली. त्यातून आपल्या कुटुंबाचा व स्वत:चा आर्थिक स्तर मात्र चांगलाच उंचावला आणि शासनाची व सभासदांची दिशाभूल केली. याबाबत संबंधित अन्यायग्रस्त सभासदांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस स्टेशन, उपनिबंधक तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु, दोन महिन्याचा कालावधी लोटूनही या बोगस मजूर सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिवावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. ते मोकाटच फिरत असून सामान्य गरीब जनतेला न्याय मिळणार काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांनी केला आहे. कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सभासदानी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)