तीन वर्षांपूर्वी मुख्याधिकारी चव्हाण या नगरपरिषदेत रूजू झाले होते. या तीन वर्षांतील त्यांचा बराचसा कार्यकाळ वादळी व चर्चेचा राहिला. एका वादग्रस्त कामानंतर ते सलग नऊ महिने रजेवर होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तेव्हापासूनच ते येथून बदली करून घेण्याच्या खटपटीत होते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, ३ मे २०२१ रोजी नगर विकास विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यांची पदस्थापना आता अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या बदलीने नागभीड नगरपरिषदेचा प्रभार पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत सिंदेवाही नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती आहे.