शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

चिचोलीचा मालगुजारी तलाव कुचकामी

By admin | Updated: September 6, 2014 23:40 IST

नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र

मोहाळी (नलेश्वर) : नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र दुरवस्था झाली आहे. तुरूंबाला लिकेज असून तलावातील पाणी नाल्याला वाहून जात आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई उपविभाग सिंदेवाही यांच्या अखत्यारितीत हा तलाव येत असून संबंधीत विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक वर्षांपासून तलावाचे तुरूंब पूर्णत: लिकेज आहे. तलावाचे पाणी तुरूंबातुन नाल्याला वाहुन जात आहे. त्यामुळे तलावात सिंचनाकरिता पाणीच राहत नाही. त्यामुळे धान शेती पाण्याअभावी मरण्याची शक्यता आहे. तलावाच्या मुख्य नहराचीही मोडतोड झाली आहे.दुष्काळ निवारण्यासाठी व धान पिकाला संरक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी मालगुजारी तलावाची निर्मीती करण्यात आली. नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या शेजारी हा मालगुजारी तलाव असुन या तलावाची ओळख चिचोली तलाव म्हणून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या तलावाचे बांधकाम झालेले असुन या तलावाचे पाणी धान पिकाला दिले जाते. तलावाचे सिंचन क्षेत्र १५० हेक्टर आहे. हा तलाव जवळपास निर्मितीपासूनच दुर्लक्षित आहे. हा तलाव माजी माल गुजारी तलाव आहे किंवा नाही हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाला माहीतही नव्हते. या संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मुख्य पाळीला पूर्णत: जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या तलावाच्या मुख्य पाळीने सहजासहजी जाता येत नाही. तर तलावाचे तुरूंब पूर्णता लिकेज व फुटून असल्याने पाणी नाल्याला वाहुन जात असते. मुख्य नहर पूर्णत: मोळकळीस आल्याने मालगुजारी तलावाची अत्यंत दयनिय अवस्था आहे. यावर्षी अपुरा पाऊस व दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. धान पीक करपली आहेत. तर अनेकांची रोवणी झालेली नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असुन कर्जाच्या दलदलीत आहे. अनेक तलावाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत नूतनीकरण करण्यात आले. मात्र चिचोली माजी मालगुजारी तलावाची अत्यंत बिकट अवस्था असतानादेखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचाई विभागाने अनेक वर्षांपासून याकडे लक्ष दिले नाही. वास्तविक पाहता १५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या तलावाचे नूतनीकरण झाले असते तर, शेतकऱ्यांना सिंचनासाठीपाणी मिळाले असते.