शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर, पानसरे खुनाचा तपास करा

By admin | Updated: August 31, 2016 00:45 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला ३६ महिने आणि त्याच ...

ऊर्जानगरात सभा : महाराष्ट्र अंनिसची मागणीचंद्रपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला ३६ महिने आणि त्याच धर्तीवर ज्येष्ठ समाजसुधारक काम्रेड गोविंद पानसरे यांचे खुनाला १८ महिने होऊनही त्यांचे मारेकरी व मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत. महाराष्ट्र शासनाने या दोघांच्या खुनाच्या तपासाबाबत अक्षम्य दिरंगाई केलेली असल्यामुळे डॉ. दाभोळकर यांचे तिसऱ्या स्मृतीदिनी ऊर्जानगर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते व समितीच्या हितचिंतकांनी तीव्र निषेध केला. पुरोगामी महाराष्ट्रातील संत व समाजसुधारकांच्या कार्याचे स्मरण करुन या दोघाच्या खुनांचा तपास यापुढे महाराष्ट्र शासनाने विनाविलंब लावावा, अशी मागणी या सभेमध्ये करण्यात आली. तसेच डॉ. दाभोळकर व पानसरे यांच्या मारेकऱ्यांना व मुख्य सूत्रधारांना कधी पकडणार, या आशयाची पत्रे लिहून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थितांनी पाठविली आहे. या सभेमध्ये जाधव यांनी मार्गदर्शन केले. सभेचे संचालन ऊर्जानगर शाखेचे कार्यवाह नारायण चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)