शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चार्लीत डेंग्युसदृश तापाची साथ सुरूच

By admin | Updated: September 9, 2014 00:16 IST

राजुरा तालुक्यातील चार्ली येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या डेंग्युसदृश तापाच्या साथीचा प्रकोप वाढतच असून सोमवारी पुन्हा एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सास्ती : राजुरा तालुक्यातील चार्ली येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या डेंग्युसदृश तापाच्या साथीचा प्रकोप वाढतच असून सोमवारी पुन्हा एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या आजाराने अजुनही शेकडो रुग्ण बाधित असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असूनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.राजुरा तालुक्यातील नदीपट्टा भागातील गावात तापाची साथ सुरू आहे. त्यात चार्ली येथे मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून गावातील प्रत्येक घरात एक रुग्ण आढळून येत आहे. परंतु मोठ्या प्रमाणात साथ सुरू असतानाही आरोग्य विभागा याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तीन दिवसांपूर्वीच येथील माया दत्तु बोढे (३०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर सोमवारी येथील मारोती चिंधूजी आत्राम (३६) या युवकाचा मृत्यू झाला. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गावात शेकडो रुग्ण बाधित असून अनेक रुग्ण राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात संजय गौरकार यांचा मुलगा, यादव वडस्कर, आशिष बोढे यांची भाची, विजय निवलकर यांचा मुलगा व मुलगी विनोद खवसे, गंगाधर कुचनकर यांची मुलगी, कवडू खवसे यांची मुलगी, किशोर घाटेयांचा मुलगा, शंकर वडस्कर यांचे वडील इंद्रजीत झुंगरे यांची पत्नी, जयराम दरेकार यांचा मुलगा, किसन टोंगे यांची पत्नी, सतिश मुसळे यांची मुलगी ढुमने परिवारातील काही सदस्यांचा समावेश आहे.गावात सुरू असलेल्या तापाच्या साथीमुळे नागरिक हैराण झाले असून गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यामुळे याठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर लावून वैद्यकीय सेवा त्वरीत पुरविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)