शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आनापनाद्वारे होणार विद्यार्थ्यांत परिवर्तन

By admin | Updated: August 17, 2014 23:04 IST

विद्यार्थ्यांची एकाग्रता, त्यांचे मन स्थिर राहावे, यातून त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आता महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये आनापना उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मनपा शाळेत उपक्रम : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत होणार वाढसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरविद्यार्थ्यांची एकाग्रता, त्यांचे मन स्थिर राहावे, यातून त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आता महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये आनापना उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे.महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थीसंख्या घटत आहे. पालकांनीही या शाळांकडे पाठ फिरवली आहे. केवळ गरिबांच्या विद्यार्थ्यांची शाळा अशी ओळख महानगरपालिकांच्या शाळांची झाली आहे. विशेष म्हणजे, या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार या शाळांतील विद्यार्थ्यांना स्वत:चे नाव, शाळा, वर्ग, शिक्षकांचे नावही लिहिता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच शाळांतील विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना पाहिजे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे आता प्रथम विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आनापनाद्वारे विद्यार्थ्यांचे मन स्थिर करण्यासाठी, त्यांच्यातील चंचलता दूर करून एकाग्रतेसाठी शहरातील सर्व महानगरपालिका शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी दररोज विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळी दहा मिनिटांपर्यंत श्वसनावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. यामध्ये श्वास घेणे आणि सोडणे याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे मन एकाग्र करण्यासाठी शिक्षक स्वत: विद्यार्थ्यांच्या या क्रियेकडे लक्ष देणार आहे. या क्रियेमुळे चंचलता नाशिही होऊन स्वभावदोषांमध्ये परिवर्तन होते. तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेमध्येसुद्धा वाढ होणार असून स्वच्छता, निटनेटकेपणाही शिकविण्यात येणार आहे.