शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलला

By admin | Updated: April 16, 2016 00:41 IST

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडी कात टाकत आहे.

बांधकाम अंतिम टप्प्यात : गजानन महाराज संस्थानचा पुढाकारघनश्याम नवघडे नागभीडशेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडी कात टाकत आहे. या ठिकाणी अनेक बांधकाम सुरू असून या बांधकामांनी अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अड्याळ टेकडीचे बदललेले हे रूप पर्यटकांच्या आंनदात भर पाडत आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. या अड्याळ टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्ष मौन धारण करून साधना केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर पडले. संबंध महाराष्ट्रात व देशात त्यांचे समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवरही त्यांनी विशेष लक्ष पुरविले. अड्याळ टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सार्वभौम असे एक खेडे तर निर्माण केलेच पण त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दिक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा या महान आणि आदर्श अशा समाजसेवकांनी ८ जून २००६ रोजी आपले इहलोकीचे कार्य कायमचे संपविले.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संबंध महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकाराम दादा आणि आपले काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी दादांच्या समाधी स्थळासाठी शेगाव संस्थान दोन कोटी रुपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादांच्या समाधीस्थळांचे बांधकाम काही दिवसाअगोदर हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. समाधीस्थळांचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागिरसुद्धा राजस्थानातूनच मागविण्यात आले आहेत. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल असे जलाशय, लता वेली आणि विविध जातीच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आणि त्या टेकडीवर हे विलोभनीय बांधकाम. त्यामुळे अड्याळ टेकडीचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे. गीताचार्य तुकारामदादा ज्या ठिकाणी बसून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत त्या ठिकाणी भव्य असे सभागृह बांधण्यात आले आहे. आणखी छोटी-मोठी अनेक कामे करण्यात आली आहे. या कामांनी अड्याळ टेकडीचा चेहरा मोेहराच बदलून गेला आहे. ज्यांनी अड्याळ टेकडीला दोन वर्षाअगोदर भेट दिली होती, त्यांनी जर आज भेट दिली तर ही नवलाई डोळ्यात भरल्याखेरीज राहणार नाही.