शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर-पुणे वातानुकुलित बसचा शुभारंभ

By admin | Updated: August 18, 2016 00:32 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चंद्रपूर-पुणे वातानुकुलित स्कॅनिया बस बुधवारपासून सुरु करण्यात येत आहे.

सुधीर मुनगंटीवार : दर कमी करणार चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चंद्रपूर-पुणे वातानुकुलित स्कॅनिया बस बुधवारपासून सुरु करण्यात येत आहे. या बसचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज बुधवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक कार्तिक सहारे, विभागीय वाहतूक अधिकारी निलेश बेलसरे, आगार व्यवस्थापक विजय कुळे, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, प्रमोद कडू, वनिता कानडे, अंजली घोटेकर, तुषार सोम, रामपाल सिंह, सुभाष कासनगोटूवार उपस्थित होते.ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शहरामधील व जिल्हयातील कर्मचारी, व्यापारी व पुणे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच नागरिकांनी आपणाकडे वारंवार निवेदने देऊन चंद्रपूर-पुणे बस सुरु करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन संबंधित विभागाशी चर्चा करून आज चंद्रपूर-पुणे वातानुकूलीत स्कॅनिया बस सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचा विचार करुन चंद्रपूर-पुणे रेल्वे सुरु करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बसचे सध्याचे तिकीट दर कमी करण्यासाठी आपण संबंधित विभागाशी चर्चा केली असून लवकरच तिकीटाचे दर कमी करण्यात येईल. महामंडळाच्या बसेस या गरीब व सामान्य जनतेचे वाहन असल्याने या बसस्थानकामध्ये चांगल्या सोईसुविधा निर्माण करण्यासाठी आपण १२५ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला दिले आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)