शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महावितरणने ४ हजार ५८५ वीज ग्राहकांना दिला शाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

पोकळ आश्वासनांमुळे विनाकारण अंधारात राहण्याची वेळ सामान्य वीज ग्राहकांवर आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीजबिल थकविले. विशेष म्हणजे, जे ग्राहक दर महिन्यात वीजबिल भरत होते. त्यांनीही काही राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे बिल माफ होईल या आशेपोटी बिल भरणे टाळले. 

ठळक मुद्देथकबाकीदारांना अंधारात राहण्याची आली वेळ : २८ फेब्रुवारीपर्यंत होणार अन्य थकबाकीदारांची वीज कट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाकाळात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून वीजबिल थकविलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४  हजार ५८५ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज शाॅक दिला आहे. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारीपर्यंत वीजबिल न भरल्यास उर्वरित ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनाचे काय, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे. पोकळ आश्वासनांमुळे विनाकारण अंधारात राहण्याची वेळ सामान्य वीज ग्राहकांवर आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीजबिल थकविले. विशेष म्हणजे, जे ग्राहक दर महिन्यात वीजबिल भरत होते. त्यांनीही काही राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे बिल माफ होईल या आशेपोटी बिल भरणे टाळले. दरम्यान, यासाठी विविध आंदोलनेही झाली. मात्र, सरकारने आजपर्यंत यावर कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या बिलाचा भर पडत ग्राहकांवर सद्यस्थितीत हजारो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे महावितरणने आता सक्त पाऊल उचलले असून थकबाकीदारांची वीज कट करण्याचा  सपाटा सुरू केला आहे. यासाठी महावितरणला वरिष्ठांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत वसुली करण्याचे सक्त आदेश आले आहे.  दरम्यान, २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ४ हजार ५८५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.  यात चंद्रपूर मंडळातील ३ हजार ३५८ घरगुती, १०५८ वाणिज्यिक व १६९ औद्योगिक  ग्राहकांचा समावेश आहे. 

  ४६ हजार ८७९ ग्राहकांनी थकविले बिलएप्रिल २०२० पासून २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ८८ हजार २१४ ग्राहकांनी ७० कोटींचा २० लाखांचा भरणा केला नाही. चंद्रपूर मंडळातील ४६ हजार ८७९ हजार ग्राहकांनी ४४ कोटी ५० लाख व गडचिरोली मंडळातील ४१ हजार ३३५ ग्राहकांनी २५ कोटी ८० लाख भरले नाहीत. 

सर्व  थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई  सुरू आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत अशा थकबाकीदारांनी वीजबिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.     - सुनील देशपांडे , मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

  २८ हजार ग्राहक बचावलेमागील दहा महिन्यांपासून एकही वीजबिल न भरलेल्या ग्राहकांपैकी २८ हजार २८ ग्राहकांनी २३ कोटी ७० लाखांच्या वीजबिलाचा भरणा केला. त्यामुळे या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होण्यापासून बचावले आहे.

  गावातील नेते गायबवीज कट करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीज कट करू देऊ नका, आम्हाला सांगा असे म्हणणारे बहुतांश गावातील नेतेही आता गायब झाले आहे.

 

टॅग्स :electricityवीज