शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या घटनादत्त अधिकारांसाठी चंद्रपुरात घंटानाद आंदोलन

By admin | Updated: August 26, 2016 00:59 IST

ओबीसींच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या वतीने आज गुरुवारी घंटानाद व डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.

निवेदन सादर : डफडे वाजवून शासनाच्या धोरणाचा निषेधचंद्रपूर : ओबीसींच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या वतीने आज गुरुवारी घंटानाद व डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. नियोजनानुसार आमदार व खासदारांच्या घरासमोर हे आंदोलन होणार होते. मात्र पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासमोर आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जटपुरा गेटपर्यंतच्या मार्गावर घंटानाद व डफडे वाजवून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.वर्तमान भाजप सरकारने ओबीसी आरक्षणामध्ये कपात केली आहे. युपीएएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३१४ पैकी १२० ओबीसी उमेदवारांना प्रशिक्षणाकरिता पोस्टींग देण्यात आली नाही, याचा विरोध करण्यासाठी व आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. आज सकाळी ९ वाजता राजुऱ्याचे आमदार संजय धोटे यांच्या घरासमोर घंटनाद व डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तशी परवानगी दिली नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित झाले. तिथून जटपुरा गेटवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत घंटानाद व डफडे बजाओ आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी हजारो पत्रके वाटून नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. ओबीसी फेडरेशनचे संयोजक व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचे आकडे घोषित करा, दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जनगणना करा, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप द्या, ओबीसींना प्रमोशनमध्ये आरक्षण द्या, नॉन क्रिमीलेअरची घटनाबाह्य अट रद्द करा या मागण्यासंदर्भात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात भास्कर मून, हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरुनुले, नितीन भटारकर, ल.वि. घामी, राजकुमार जवादे, विनोद सोनटक्के, शैलेश लोखंडे, डी.के. आरीकर, डॉ. बाळकृष्ण भगत, दिलीप होरे, राकेश कालेशवार, सरपंच अमोल ठाकरे, सतीश निमसरकर, संदीप पिंपळकर, संदीप रोहणे व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)