शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्हा कारागृह हाऊसफुल्ल

By admin | Updated: January 22, 2016 01:58 IST

चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येमुळे हाऊसफुल्ल झाले आहे. दारूविक्रीच्या गुन्ह्यातील वाढते

चंद्रपूर : चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येमुळे हाऊसफुल्ल झाले आहे. दारूविक्रीच्या गुन्ह्यातील वाढते आरोपी व विविध प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपुरातील कैद्यांना अकोला येथील कारागृहात रवानगी करण्यात येत आहे. कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील जवळपास १५० कामगारांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी आंदोलन केले. त्यातील ८१ कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व कामगारांनी न्यायालयात जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांची रवानगी चंद्रपूर कारागृहात जागा नसल्याने अकोला कारागृहात करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची ३३३ कैद्यांची क्षमता आहे. परंतु या कारागृहात आधीच विविध गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत आहेत. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने दररोजच दारूविक्रेत्यांना अटक केली जात असून १५ ते २० अवैध दारूविक्रेत्यांची रवानगी कारागृहात केली जात आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सध्याची स्थिती अत्यंत ‘टाईट’ असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या एका अधिकाऱ्याने आपले नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. (स्थानिक प्रतिनिधी)एम्टाचे ८१ कामगार अकोला कारागृहात४कर्नाटक एम्टा खाणीतील कामगारांनी बुधवारी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी भद्रावती येथे आंदोलन केले. पेट्रोलपंप चौकापासून पोलीस ठाण्यापर्यंत कामगारांनी रॅली काढून प्रशासनाने मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्हाला अटक करावी म्हणून पोलीस ठाण्यातच आंदोलन सुरू केले. त्यामुळे जवळपास दीडशे कामगारांना अटक करण्यात आली. यातील ८१ कामगारांनी जामीन नाकारल्याने त्या सर्वांची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली आहे. गेल्या ९ महिन्यापासून कर्नाटक एम्टा खुली कोळसा खाण बंद आहे. याठिकाणी कार्यरत कामगारांना खाण बंद पडल्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. तसेच खाण सुरू असताना देण्यात येणाऱ्या इतर सुविधाही बंद करण्यात आल्या. वेतन मिळत नसल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. वेतनवाढ, स्थायी नोकरी या मागण्यांच्या पुर्ततेसाठी कंपनीच्या विरोधात कामगारांनी लोकप्रतिनिधींसोबत अनेक आंदोलने केलीत. परंतु, त्याचा फायदा झाला नाही. खाण बंद झाली तेव्हापासून कोणत्याही नेत्यांने कामगारांची भेट घेतली नाही. विद्यमान खासदारांकडून आश्वासनाच्या पलिकडे काहीच मिळाले नसल्याचा आरोप कामगारांचा आहे. (शहर प्रतिनिधी)