शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील शेतमजूर चंद्रपूर जिल्ह्यात

By admin | Updated: April 17, 2016 00:35 IST

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी त्याची दाहकता अधिकच वाढली आहे.

दुष्काळाची दाहकता वाढली : शेतावर गडी म्हणून करीत आहेत कामरत्नाकर चटप नांदाफाटागेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी त्याची दाहकता अधिकच वाढली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुर हतबल झाला आहे. रोजगारच मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेतमजुर रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात दाखल झाले आहेत. तेलंगणा सीमेलगतच्या कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांकडे गडी माणूस म्हणून या मजुरांनी काम स्वीकारले आहे. त्यापोटी एका वर्षाचे त्यांना ८० ते ९० हजार रुपये मिळणार आहे. सोबतच राहण्याची व इंधनाची सोय संबंधित शेतकरी या शेतमजुरांसाठी करून देत आहे. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने शेतात काम मिळते. तसेच जिवती तालुक्यात २५ ते ३० वर्षांपासून मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी आदी जिल्ह्यातील नागरिक स्थलांतरीत होऊन कायम वास्तव्यास आहेत. माणिकगड पहाडावर शेती व्यवसायातून त्यांची गुजरान सुरू आहे. यंदा मराठवाड्या भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे तेथील शेतमजुर रोजगाराचा शोध घेत कोरपना ताालुक्यात दाखल झाले आहेत. गावात शेतीवर काम करणाऱ्या गडी माणसांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे वर्षाचे ९० हजार ते १ लाख रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना केवळ गडी माणसाला द्यावी लागते. दुसरीकडे हे काम करणारी माणसं मिळत नसल्याने शेतकरी बाहेरगावावरून माणसांना शेतावर कामासाठी आणत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांची ही गरज ओळखून दुुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील शेतमजुरांना येथील शेतकरी कामावर ठेवत आहेत. त्यांच्यासाठी शेतातच ताटवे, टिनाचे पत्रे लावून निवाऱ्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. काही शेतकरी वर्षभरासाठी जळावू लाकडांची व्यवस्था गडी माणसांना करून देत आहे. कोरपना तालुक्याला लागून तेलंगाणाची सीमा आहे. त्यानंतर मराठवाड्याची सीमा सुरू होते. एकापाठोपाठ एक होत आहे दाखलसुुरूवातीला आदिलाबादमार्गे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून दोन ते तीन शेतमजूर कोरपना तालुक्यात आले. त्यांना शेतकऱ्यांकडे राहण्याची व रोजगारांची संधी मिळाल्याने आता मराठवाड्यातील अनेक कुटुंब कामाच्या शोधात या परिसरात दाखल होत आहे.तिकडं गुराढोरांची लई बेकार अवस्थामराठवाड्यात दुष्काळामुळे माणसांबरोबरच गुरढोरांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पाणी नसल्याने शेतात चारा नाही. नाले, नद्या कोरड्या झाल्या आहे. अहो माणसाले पाणी मिळेना अशी अवस्था आहे असे मामा कांबळे किनवट या शेतमजुराने सांगितले.पाण्यासाठी जातो पूर्ण दिवसयावर्षी मराठवाड्यात पाऊस नसल्याने गावातील विहीरी, लहान नाले आटले आहेत. शासनाकडून कााही दिवस टँकरनी पाणी पुरवठा करण्यात आला. त्यातही अर्ध्या लोकांची तहान भागली तर अर्धे गावकरी पाण्यासाठी आटापिटा करीत राहिले. आता टँकरही येत नाही. पाण्यासाठी लांब अंतरावरून एखाद्या विहिरीतून पाणी आणावे लागते. एकाच विहिरीवर सारा गाव पाणी भरतो.