शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाचे चार हल्ले, तिघांचा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:51 IST

Chandrapur news चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे चार हल्ले झाले. यामध्ये वाघाने तिघांचा बळी घेतली तर एकाला जखमी केले.

ठळक मुद्देमृतकांमध्ये दोन महिला व एक पुरुष वनरक्षकालाही केले जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे चार हल्ले झाले. यामध्ये वाघाने तिघांचा बळी घेतली तर एकाला जखमी केले. मृतकांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. तर एका वनरक्षकाला वाघाने जखमी केले. या चारही घटना बुधवारी दिवसभरातील आहे. रजनी भालेराव चिकराम (३५) रा. घोटनिंबाळा ता. भद्रावती, सिताबाई गुलाब चौके (५५) रा. कोकेवाडा(पेंढरी) ता. सिंदेवाही व रामा आडकू मारबते (६५) रा. निफंद्रा ता. सावली यांचा वाघाच्या हल्ल्यात घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सावली तालुक्यातील गेवरा येथील वनरक्षक संदीप चुधरी यांना वाघाने हल्ला चढवून जखमी केले.

भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा येथील रजनी चिकराम ही महिला गावातील काही महिलांसह तेंदूपत्ता संकलनासाठी आयुध निर्माणीच्या जंगल परिसरात गेली होती. सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक वाघाने हल्ला चढविला. यावेळी अन्य महिला आक्रोश करीत तेथून पळत सुटल्या. यामध्ये वाघाने रजनीला जागीच ठार केले. भद्रावतीचे वनपरिक्षेत्राधिकारी राठोड व क्षेत्र सहाय्यक एन. व्ही. हनुवते यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यात घडली. कोकेवाडा येथील काही महिलांसह सिताबाई चौके ही महिलाही तेंदूपत्ता संकलनासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रात येत असलेल्या पेंढरी कोके जंगलात सकाळी गेली गेली होती. आठ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक या महिलेवर हल्ला चढवून जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही व नवरगाव येथील पोलीस व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. संचारबंदीत नागरिकांचे रोजगार ठप्प झाल्याने आता नागरिक तेंदूपत्ता संकलनाचे कार्य करीत आहेत; मात्र पाण्याच्या शोधात जंगलातील वन्यप्राणी गावाजवळ येत असल्याने नागरिकांनी जंगल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

तिसरी घटना सावली तालुक्यातील पाथरी नियतक्षेत्रातील मेहा बिटात कक्ष क्रमांक १५७ मध्ये घडली. निफंद्रा येथील रामा आडकू मारबते हे बकऱ्यांसाठी चारा आणायला सकाळी जंगलात गेले होते. अशातच त्यांचा वाघाने बळी घेतला. ही घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी व सावलीचे ठाणेदार सतीश बन्सोड यानी आपल्या ताफ्यासह जावून घटनास्थ‌ळाचा पंचनामा केला. चौथी घटनाही सावली तालुक्यात घडली. मंगळवारी सावली वनपरिक्षेत्रात वाघाने एका महिलेवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. या घटनेच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी यांच्यासह पाथरीचे क्षेत्र सहाय्यक कोडापे, पालेबारसाचे वनरक्षक राकेश चौधरी, खानाबादच्या वनरक्षक पाल, पाथरीचे शेंडे व गेवराचे वनरक्षक संदीप चुधरी ही मंडळी वाघाची शोधमोहीम राबविण्यासाठी जंगलात गेले होते. अशातच अचानक वाघाने वनरक्षक चुधरी यांच्यावर हल्ला चढविला. सुदैवाने यातून ते थोडक्यात बचावले. त्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या चारही घटनांनी चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा वाघाच्या दहशतीत आला आहे.

सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. यामुळे लाॅकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील मजूर वर्गाला रोजगार प्राप्त झाला आहे. मोठ्या प्रमाणावर जंगल शेजारील नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात आहे. मात्र वाघाचे हल्ले वाढले आहेत. यामुळे पुन्हा मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची चिन्हे दिसत आहे.

मुंडके धडावेगळेसावली तालुक्यातील निफंद्रा येथील रामा मारबते यांच्यावर वाघाने केलेला हल्ला थरारक होते. वाघाने हल्ल्यात रामाचे मुंडके धडावेगळे केल्याचे दिसून आले. रामाला मुंडके नसलेला मृतदेह पडून होता.

टॅग्स :Tigerवाघ