शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

सीईओ धडकले दत्तक गावात

By admin | Updated: September 2, 2016 00:48 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहे.

ग्रामविकासाचा घेतला आढावा : गावांचा चेहरामोहरा बदलणारचंद्रपूर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांनी कोरपना या दुर्गम तालुक्यातील खिरडी व रुपापेठ ही दोन गावे दत्तक घेतली. या दोन गावांचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर देवेंदर सिंह यांनी काल बुधवारी आपल्या दत्तक गावात आकस्मिक धडक दिली व गावांच्या संपूर्ण विकासासाठी काय आवश्यक आहे, याची खातरजमा करून तशा सूचना संबंधितांना केल्या.जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देवेंदर सिंह रुजु झाल्यावर जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामविकासासाठी नवनविन संकल्पना साकारल्या जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना पंचायत समितीनिहाय संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने ग्रामविकासात गती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी कोरपना तालुक्यातील खिरडी, रुपापेठ या दोन मागासलेल्या व दुर्गम गावांच्या विकासाची स्वत: जबाबदारी घेतली आहे. ही दोन गावे आदर्श करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार व्यस्त वेळेतून वेळ काढून गावात जाऊन गावसभा, गावफेरी, ग्रामस्थांशी चर्चा करुन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आता त्यांनी सुरु केला आहे. त्या अनुषंगाने या गावांना सिंह यांनी बुधवारी भेट दिली. गावांचा सर्वांगीण विकास करुन ग्राम आदर्श करण्यासाठी सर्वप्रथम ग्राम हागणदारीमुक्त केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केल्या. गाव सर्वप्रथम हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामस्तरावर तीन पुरुष व तीन महिला यांची स्वच्छतेचे प्रेरक म्हणून निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन्ही गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळा, अंगणवाडीची दुरुस्ती, रंगरंगोटी याशिवाय गावातील युवकांना शासनातील विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा म्हणून स्पर्धा परीक्षाच्या पुस्तकांनी सज्ज असणारे वाचनालय मंजूर करण्यात आले. याशिवाय गावस्तरावरील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केन्द्राची त्यांनी स्वत: जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या सुविधा हव्या, याविषयीच्या सूचनाही सबंधितांना केल्या. यावेळी कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, शिक्षणाधिकारी घारकर, कोरपना पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छ भारत मिशनचे आयईसी कृष्णकान्त खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, अभियंता स्वच्छता तज्ज्ञ तृशांत शेंडे, रोहण बालमवारव मोठ्या प्रमाणात गावातील महिला, पुरुष, युवक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)थोर पुरुषांचे दिले उदाहरणया गावातील ग्रामस्थ, युवक, महिला यांच्याशी चर्चा करुन त्यांना संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जनकार्यांची उदाहरणे देऊन ग्रामविकास कसा करावा, याविषयीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सिह यांनी ग्रामस्थांना दिली.गावाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपण आपले ग्राम हागणदारी मुक्त केले पाहिजे. ‘स्वच्छतेतून समृध्दीकडे’ हा मंत्र सर्व ग्रामस्थांनी स्वीकारला पाहिजे. गावात स्वच्छता असेल तर त्या गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहते व गाव विकासाकडे वाटचाल करते. यासाठी सर्व ग्रामस्थांनी गावाच्या विकासाकरिता एकत्र येऊन ग्राम आदर्श करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. - देवेंदर सिंह , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर.