शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघड क्षेत्रातील शाळांच्या निवडीत केंद्रप्रमुखांची मनमर्जी

By admin | Updated: March 20, 2017 00:28 IST

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

बदलीपात्र शिक्षकांत रोष : पंचायत समित्यांनी केलेली निवड अयोग्यचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. शिक्षकांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या करताना २७ फेब्रुवारी २०१७ च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयात अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राची निवड करण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. मात्र प्राथमिक शिक्षण विभागाने ६ मार्च रोजी एक परिपत्रक काढून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना अवघड व सर्वसाधारण क्षेत्राची निवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात केंद्रप्रमुखांच्या मर्जीतील शाळांना अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट केले जात असल्याने या प्रकाराने अनेक शिक्षकांत तीव्र संताप पसरला आहे. कोणत्या शाळा अवघड क्षेत्रात आणि कोणत्या शाळा सर्वसाधारण क्षेत्रात आहेत, याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना विचारणा करायला पाहिजे होती. परंतु त्यांनाही विश्वासात न घेता परस्पर केंद्रप्रमुखांनी सुचविलेल्या शाळांचीच अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून निवड केलेली आहे, असा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे. अवघड क्षेत्रातील शाळेची निवड करताना किमान शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. अवघड क्षेत्रातील शाळांची करण्यात आलेली निवड ही चुकीची असून जिल्ह्यातील बफर झोनमधील शाळांना अवघड क्षेत्रात दाखविण्यात येऊन शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सीईओ व उपशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन अवघड क्षेत्रातील शाळा निवडीच्या प्रकारावर रोष व्यक्त करीत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष जे. डी. पोटे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदरसिंह व प्राथ. विभागाचे उपशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात बफर झोनमधील शाळांना अवघड क्षेत्रात दाखविण्यात यावे, बदली प्रक्रियेपूर्वी विषय शिक्षकांची पदस्थापना करणे, वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वरोरा पं.स. मधील आदिवासी प्रोत्साहन भत्त्यांची थकबाकी काढणे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी संघटनेचे सचिव किशोर उरकुंडवार, वरोराचे तालुकाध्यक्ष विद्याचरण गोलर, चंदन बिलपणे, गडचांदूर सोसायटीचे अध्यक्ष शंकर गोरे, उपाध्यक्ष नारायण तल्कापल्लीवार, अनिल झाडे, संतोष जुनघरे यांची उपस्थिती होती.