शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी सन्मान अवॉर्डचा सोहळा रंगला

By admin | Updated: October 23, 2016 01:09 IST

‘लोकमत’च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या रणरागिणीचा लोकमत सखी सन्मान अवार्ड देऊन गौरव करण्यात आला.

कर्तृत्ववान रणरागिणींचा गौरव : देखणा व नेत्रदीपक सोहळाचंद्रपूर: ‘लोकमत’च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या रणरागिणीचा लोकमत सखी सन्मान अवार्ड देऊन गौरव करण्यात आला. या निमीत्त झालेल्या शानदार सोहळ्यात अवार्ड विजेत्या महिलांची माहिती देऊन त्यांच्या कार्याचा यथायोग्य सन्मान करण्यात आला. हा आकर्षक, देखणा व नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्याची संधी ‘लोकमत’ने चंद्रपुरकरांना उपलब्ध करुन दिली.आयएमए सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवियत्री झाडीकन्या अंजनाबाई खुणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महापौर राखी कंचर्लावार, कृषीजीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सहकार नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे, खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक राजेश खंडेलवाल, वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बोढे, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, नगरसेवक संजय वैद्य, संगिनी ग्रुपच्या अध्यक्ष अ‍ॅड. विद्या बांगडे, इव्हेंट मॅनेजर आतिष वानखेडे, समाजसेविका वर्षा कोठेकर आदी उपस्थित होते.या रंगारंग कार्यक्रमात स्क्रिनवर कर्तृत्ववान महिलांची माहिती सादर करण्यात आली. चित्रफितीतून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते सखी सन्मान अवार्ड- २०१६ प्रदान करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार मानकरी महिलांचे स्वागत केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे संचालन नागपूर लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर जिल्हा इव्हेंटप्रमुख अमोल कडूकर आणि चंद्रपूर जिल्हा सखी मंच संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार लोकमतचे चंद्रपूरचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले यांनी मानले. किरण बल्की यांनी सुंदर रांगोळ्यांनी सभागृहात आपल्या कलेचा रंग भरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमण बोथरा, मंगेश भांडेकर, ताज कुरेशी, रवी जवळे, अनिकेत चांदेकर, झिलत पठाण, विशाल श्रीकांत खडसे यांच्यासह सखी मंचच्या व युवा नेक्स्टच्या अनेक सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)