शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची संस्कृती जपणारा उत्सव पोळा

By admin | Updated: September 3, 2016 00:37 IST

भारत हा संस्कृतीप्रधान देश असून शेतकऱ्यांची संस्कृती जपणारा उत्सव पोळा सण आहे.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : कढोली येथे पोळा उत्सव साजराराजुरा : भारत हा संस्कृतीप्रधान देश असून शेतकऱ्यांची संस्कृती जपणारा उत्सव पोळा सण आहे. राबराब राबणारा शेतकरी वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर वर्षांतून एकदा मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात पोळा उत्सव साजरा केला जाते. केंद्र सरकारही देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकासासाठी झटत आहे, शेतकऱ्यांनी केंद्राच्या योजनां लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.राजुरा तालुक्यातील कढोली येथे आयोजित बैलजोडी सजावट स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, तहसीलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, भाजपाा नेते विनायक देशमुख, वाघु गेडाम, भाऊराव चंदनखेडे, भाजपा सरचिटणीस अरुण मस्की, राजू घरोटे, कढोलीचे सरपंच रसिका पडवेकर, उपसरपंच सुभाष झाडे, ग्रा. पं. सदस्य दिलीप बोबडे, देवेंद्र उपरे, संगीता पायपरे, प्रतिभा हिंगाणे, पुरुषोत्तम हिंगाणे, मधूकर पायपरे, राजु उरकुडे, मनोहर जेणेकर, राकेश हिंगाणे उपस्थित होते. स्वर्गीय कालीदास अहीर स्मृती प्रित्यर्थ आयोजित बैलजोडी सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आनंदराव झाडे यांच्या बैलजोडीने पटकाविले. द्वितीय आनंद बोबडे, तृतीय घनश्याम हिंगाणे, चतुर्थ दत्तु हिंगाणे यांनी पटकाविला. कढोली येथील पोळा उत्सवात मोठ्या थाटात बैलजोड्या सजावट करून सहभागी झाले होते. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. अशोक आस्वले यांचा बैल वीजपडून मरण पावल्याने त्याला अनुदान म्हणून २५ हजाराचा धनादेश ना. हंसराज अहीर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका महामंत्री घरोटे यांनी केले. संचालन भाजपा राजुरा तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे यांनी तर आभार पुरुषोत्तम हिंगाणे यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला कढोली येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)